अस्तगाव शिवारात अपघातात पती ठार, पत्नी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 23:12 IST2022-04-03T23:11:36+5:302022-04-03T23:12:11+5:30
मनमाड : येथील मनमाड-खादगाव रोडवरील अस्तगाव शिवारात ट्रॅक्टर व मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार राजेंद्र जालिंधर पवार, रा.नवसारी हा तरुण जागीच ठार झाला असून, पाठीमागे बसलेली त्याची पत्नी बायडाबाई राजेंद्र पवार ही गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.३) रात्री घडली.जखमी महिलेवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अस्तगाव शिवारात अपघातात पती ठार, पत्नी जखमी
मनमाड : येथील मनमाड-खादगाव रोडवरील अस्तगाव शिवारात ट्रॅक्टर व मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार राजेंद्र जालिंधर पवार, रा.नवसारी हा तरुण जागीच ठार झाला असून, पाठीमागे बसलेली त्याची पत्नी बायडाबाई राजेंद्र पवार ही गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.३) रात्री घडली.जखमी महिलेवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मनमाड-खादगाव रस्त्यावर रात्री आठच्या सुमारास मनमाड येथून बाजारहाट करून नवसारी या आपल्या गावी जात असताना अस्तगाव शिवारात असलेल्या साईनाथ मंदिराजवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला मोटारसायकलने जबर धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीस्वार राजेंद्र जालिंदर पवार रा. नवसारी, ता. नांदगाव याच्या हातापायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची पत्नी बायडाबाई राजेंद्र पवार हिला हाताला गंभीर दुखापत झाल्याने मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मनमाड पोलीस स्थानकात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.