पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयावरून पतीने प्रियकराला केले ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 12:25 IST2019-12-06T12:24:10+5:302019-12-06T12:25:01+5:30

डोक्यावर आणि शरीरावर कोयत्याने सपासप वार केले त्यामुळे गावीत त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला

Husband killed boyfriend on suspicion of having sexual relations with his wife in Nashik | पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयावरून पतीने प्रियकराला केले ठार 

पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयावरून पतीने प्रियकराला केले ठार 

नाशिक :  येथील पाथर्डी गावात एका विवाहितेच्या पतीने तिच्या प्रियकराला अनैतिक संबंधाच्या संशयावरून कोयत्याने सपासप वार करून ठार मारल्याची घटना आज सकाळी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाथर्डी गावातील गौळाणे  रस्त्यावर राहणाऱ्या नरपत सिंह गावीत याच्यावर संशयित आरोपी विठ्ठल गव्हाणे याने कोयत्याने आज सकाळी वार केले. नरपत सिंग व  विठ्ठल गव्हाणे हे दोघेही पाथर्डी गाव येथे एकमेकांच्या शेजारी राहतात.  गेल्या पंधरा दिवसापूर्वी या दोघांचे भांडण झाले होते. यामुळे संबंधित घरमालकाने गव्हाणे याच्याकडून घर खाली करून घेतले होते. शुक्रवार (दि.६) रोजी संशयित विठ्ठल याने नरपत सिंग गावित हा सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कंपनीत जाण्यासाठी निघाला असता त्याच्यावर गौळाणे रस्त्यावर अचानक हल्ला चढवला.  डोक्यावर आणि शरीरावर कोयत्याने सपासप वार केले त्यामुळे गावीत त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे दत्तात्रेय पाळदे, संदीप लांडे ,जावेद खान, सागर पाटील हे घटनास्थळी पोहचले. तातडीने जखमी गावित यांना जिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी पोलिसांनी दाखल केले. औषध उपचार सुरू असताना सुमारे सहा साडेदहा वाजेच्या सुमारास गावीत यांचा मृत्यू झाला. सदर घटना अनैतिक संबंधातून झाल्याचे समजते संशयित आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शोधक पथक रवाना झाले आहे.

Web Title: Husband killed boyfriend on suspicion of having sexual relations with his wife in Nashik