शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
5
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
6
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
7
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
8
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
9
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
10
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
11
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
12
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
13
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
14
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
15
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
16
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
17
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
18
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
19
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
20
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...

दफ्तर सांभाळताना धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:51 IST

नाशिक : जिल्ह्यासह शहरातही मान्सूनचे आगमन झालेले असतानाच प्लॅस्टिकबंदीची अंमलबाजवणीही सुरू असल्यामुळे दैनंदिन कामात प्लॅस्टिकचा वापर करता येत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसह रोज शाळेत जाणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रं व दफ्तर सांभाळतांना धांदल उडताना दिसत आहे.

ठळक मुद्देप्लॅस्टिकबंदीचा परिणाम : पावसापासून वह्या-पुस्तके वाचविण्यासाठी कसरत

नाशिक : जिल्ह्यासह शहरातही मान्सूनचे आगमन झालेले असतानाच प्लॅस्टिकबंदीची अंमलबाजवणीही सुरू असल्यामुळे दैनंदिन कामात प्लॅस्टिकचा वापर करता येत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसह रोज शाळेत जाणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रं व दफ्तर सांभाळतांना धांदल उडताना दिसत आहे.सध्या अकरावी प्रवेशासह विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्र्रक्रिया सुरू असून, त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेले कागदपत्र सोबत घेऊन सायबर कॅफेसह मार्गदर्शन केंद्र, सुविधा केंद्र, रिपोर्टिंग सेंटर आणि शाळा महाविद्यालयांमध्ये फिरावे लागत आहे.त्याचप्रमाणे प्रवेशासाठी आवश्यक असलेले जातीचे दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले आदी विविध कागदपत्रं जमविण्यासाठी आणि ते प्रवेशप्रक्रियेत सादर करण्यासाठी पावसात फिरावे लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्यासाठी अतिमहत्त्वाचे असे हे कागदपत्रं भिजून खराब होण्याची भीती आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी विद्यार्थ्यांना कागदपत्रं अथवा दफ्तरातील वह्या पुस्तकांचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या वापर येत नसल्याने पावसात महत्त्वाचे कागद आणि वह्या पुस्तके कशी जपावीत, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.शहरात प्लॅस्टिकबंदीची कडेकोट अंमलबजावणी सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्लॅस्टिकची पिशवी वापरण्याविषयी भीती आहे. त्यामुळे विद्यार्थी जाड फाइल व बॅगमधून कागदपत्रं घेऊन जात असले तरी अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्याने कागदपत्रं वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या इमारती, रस्त्यांच्या कडेची वृक्ष, बसस्थानके, चहाच्या टपºया व रस्त्यालगतच्या दुकानांच्या आश्रयाला उभे राहावे लागत असल्याने शैक्षणिक प्रवेशासाठी व शाळा महाविद्यालयांमध्ये जाताना पाण्यापासून धोका असलेले कागदपत्रं आणि वह्या पुसके सांभाळायच्या कशा? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.

पावसामुळे रेनकोटमध्येही पाणी शिरते. अशा पावसात पिशवी अथवा बॅगमध्ये कागदपत्र व प्रमाणपत्र ओले होऊन खराब झाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे किमान विद्यार्थ्यांना तरी प्लॅस्टिक बंदीतून सवलत देण्याची गरज आहे.-मयूर कोष्टी, विद्यार्थी

प्लॅस्टिकच्या पिशवीत कागदपत्रं, प्रमाणपत्र ठेवले तर कितीही पावसात ते ओले होत नाही. परंतु, प्लॅस्टिक बंदी लागू झाल्यामुळे प्रवेशासाठी बाहेर पडताना प्लॅस्टिकची पिशवी सोबत ठेवू शकत नाही. त्याचप्रमाणे दुकानदारांकडेही प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळत नसल्याने पाऊस थांबेपर्यंत तासनतास वाट पाहावी लागत असल्याने वेळ संपल्यास एकाच कामासाठी अनेक फेºया माराव्या लागतात.- रितेश टिळे, विद्यार्थी