डॉक्टर हजर नसल्याने शेकडो रुग्ण ताटकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 00:46 IST2019-12-13T23:54:36+5:302019-12-14T00:46:37+5:30

वडाळागावातील महापालिकेच्या रुग्णालयास पूर्णवेळ डॉक्टरांची नेमणूक न करण्यात आल्याने आणि वेळेवर डॉक्टर येत नसल्याने दररोज रुग्णांची गैरसोय होत असून, शुक्रवारी सकाळी डॉक्टरची वाट पाहत शेकडो रुग्ण ताटकळले, रुग्णांकडून गोंधळ सुरू झाल्याने अखेर नगरसेवक सुप्रिया खोेडे यांनी रुग्णालयात धाव घेऊन डॉक्टरांना पाचारण केले.

Hundreds of patients were knocked out because doctors were not present | डॉक्टर हजर नसल्याने शेकडो रुग्ण ताटकळले

डॉक्टर हजर नसल्याने शेकडो रुग्ण ताटकळले

ठळक मुद्देतीन वर्षांपासून मनपा रुग्णालय सुविधांविना

इंदिरानगर : वडाळागावातील महापालिकेच्या रुग्णालयास पूर्णवेळ डॉक्टरांची नेमणूक न करण्यात आल्याने आणि वेळेवर डॉक्टर येत नसल्याने दररोज रुग्णांची गैरसोय होत असून, शुक्रवारी सकाळी डॉक्टरची वाट पाहत शेकडो रुग्ण ताटकळले, रुग्णांकडून गोंधळ सुरू झाल्याने अखेर नगरसेवक सुप्रिया खोेडे यांनी रुग्णालयात धाव घेऊन डॉक्टरांना पाचारण केले.
वडाळागावातील मेहबूबनगर, सादिकनगर, गुलशननगर, मुमताजनगर, अण्णा भाऊ साठेनगरसह परिसरात दिवसागणिक लोकवस्ती वाढली असून, यात सुमारे ८० टक्के हातावर काम करणाऱ्या लोकांचा समावेश आहे. या परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार सुमारे तीन वर्षांपूर्वी घरकुल योजनेलगत लाखो रुपये खर्च करून महापालिकेने चाळीस खाटांचे रुग्णालय
बांधले.
मात्र तीन वर्र्षे उलटूनही सदर रुग्णालयात अद्यापपर्यंत रुग्णास दाखल करून औषध उपचार करण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून, या रुग्णालयात फक्त प्राथमिक उपचार करण्यात येतो. त्यासाठी डॉक्टरांची वेळ सकाळी ९ वाजेची आहे. शुक्रवारी सकाळी मानधनावर नेमणूक केलेले एक डॉक्टर काही कामानिमित्त बाहेर निघून गेले. त्यामुळे रुग्णालयात सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण असलेले बालके घेऊन त्यांच्या मातापित्यांनी गर्दी केली होती. मात्र, डॉक्टर नसल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली.
नगरसेवकांनी केली रुग्णांची विचारपूस
रुग्णालयात तपासणीसाठी आपल्या बालकांना घेऊन आलेल्या पालकांची येथे गर्दी झाली होती. परंतु डॉक्टर नसल्याने त्यांना साडेअकरा वाजेपर्यंत ताटकळत उभे राहावे लागले. या घटनेची माहिती नगरसेवक सुप्रिया खोडे यांना समजताच त्यांनी रुग्णालयात येऊन रुग्णांची विचारपूस करून तातडीने संबंधित डॉक्टरांना मोबाइलवर संपर्क करून बोलून घेतले. त्यानंतर डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी तपासणी सुरू केली.

Web Title: Hundreds of patients were knocked out because doctors were not present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.