घरफोडीत साडेचार लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:15 IST2020-02-25T22:28:46+5:302020-02-26T00:15:02+5:30
द्याने येथील आंबेडकरनगरातील प्रशिक चौकात धाडसी घरफोडी झाली. चोरट्यांनी सुमारे ४ लाख ४० हजारांचा ऐवज चोरून नेला.

घरफोडीत साडेचार लाखांचा ऐवज लंपास
मालेगाव : शहरानजीकच्या द्याने येथील आंबेडकरनगरातील प्रशिक चौकात धाडसी घरफोडी झाली. चोरट्यांनी सुमारे ४ लाख ४० हजारांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी घरमालक विशाल सुनील मेतकर यांनी रमजानपुरा पोलिसांत फिर्याद दिली. शुक्रवारी रात्री साडेअकरा ते शनिवारी सकाळी दहा वाजेदरम्यान ही चोरी झाली. चोरट्यांनी फिर्यादीच्या बंद घरात प्रवेश करुन घरातील पहिल्या मजल्यावरील लोखंडी कपाट उघडून ७८ ग्रॅम वजनाचे २ लाख ३४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, २ लाख रुपयांची रोकड, ३ हजारांची दहाभार चांदी, ३ हजारांचा भ्रमणध्वनीसंच असा एकूण ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. रमजानपुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक थोरात करीत आहेत.