मुंबई नाका-वडाळा रस्त्यावर तासभर कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:13 IST2018-10-31T00:13:15+5:302018-10-31T00:13:40+5:30

भाभानगरमधील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये एका कार्यक्रमासाठी गर्दी उसळल्याने सभागृहामागील मुंबईनाका-वडाळा रस्त्याला जोडणाऱ्या अरुंद रस्त्यावर तासभर वाहतूक कोंडी झाली.

 Hours of suspension on Mumbai Naka-Wadala road | मुंबई नाका-वडाळा रस्त्यावर तासभर कोंडी

मुंबई नाका-वडाळा रस्त्यावर तासभर कोंडी

नाशिक : भाभानगरमधील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये एका कार्यक्रमासाठी गर्दी उसळल्याने सभागृहामागील मुंबईनाका-वडाळा रस्त्याला जोडणाऱ्या अरुंद रस्त्यावर तासभर वाहतूक कोंडी झाली.  मुंबईनाका-वडाळा रस्त्याला नंदिनी नदीकाठापासून जोडणारा अरुंद रस्ता गायकवाड सभागृहामागून जातो. या रस्त्याच्या एका बाजूला नदीचा काठ असून दुसºया बाजूला रहिवासी अपार्टमेंट आहे. अगदी पंधरा ते तीस फुटांचा हा रस्ता अंतर्गत रहदारीसाठी तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर दुपारी बारा वाजेच्या सुमारास अचानकपणे कार्यक्रम आटोपून विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी पालकांची गर्दी उसळली. यामुळे रस्त्यावर चारचाकी, दुचाकी वाहनांची कोंडी झाली. या रस्त्यावरून मुंबईनाका-वडाळारोडच्या दिशेने ये-जा करणारे वाहनचालक समोरासमोर आले होते.  सभागृहाशेजारील वाहनतळातून अचानकपणे मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहनधारक आपली लेन सोडून विरुद्ध बाजूच्या लेनवर जाण्याच्या प्रयत्नाने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली.
वडाळा रस्त्यावरही कोंडी
या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा ताण वडाळा-इंदिरानगर मुख्य रस्त्यावरही पडला. वाहनांच्या रांगा थेट वडाळा रस्त्यापर्यंत लागल्याने वडाळा रस्त्यावर भारतनगरपासून विनयनगरपर्यंत वाहतूक कोंडी झाली. तर दुसरीकडे हिरवेनगरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्याचे चित्र होते. एकूणच संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा या वाहनकोंडीमुळे फज्जा उडाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Web Title:  Hours of suspension on Mumbai Naka-Wadala road