शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

कोरोनाविरोधात आशा, अंगणवाडी सेविकांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 5:39 PM

नाशिक : सध्या आरोग्य यंत्रणेवर खूप ताण पडलेला आहे. डॉक्टर, नर्सेस, सहायक कर्मचारी यांना दिवस-रात्र काम करावे लागत आहे. पुढील काही दिवसांत आशा, अंगणवाडी सेविका, होमगार्ड्स यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनादेखील मदतीसाठी तयार ठेवण्याचे निर्देश राज्य स्तरावरून मिळाले असल्याने आता त्यांना प्रशिक्षण देऊन कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या लढाईत सहभागी करून घेतले जाणार आहे.

ठळक मुद्दे आशा, अंगणवाडी सेविका, होमगार्ड्स यांना प्रशिक्षण अधिक काळजी, प्रसंगी कठोर उपाययोजना

नाशिक : सध्या आरोग्य यंत्रणेवर खूप ताण पडलेला आहे. डॉक्टर, नर्सेस, सहायक कर्मचारी यांना दिवस-रात्र काम करावे लागत आहे. पुढील काही दिवसांत आशा, अंगणवाडी सेविका, होमगार्ड्स यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनादेखील मदतीसाठी तयार ठेवण्याचे निर्देश राज्य स्तरावरून मिळाले असल्याने आता त्यांना प्रशिक्षण देऊन कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या लढाईत सहभागी करून घेतले जाणार आहे.

राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी अधिक काळजी घेण्याच्या आणि प्रसंगी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार आशा, अंगणवाडी सेविका, होमगार्ड्स यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आवश्यक आरोग्य उपचार करून घेण्यात येणार आहेत. परराज्यातील कामगार, स्थलांतरित यांच्यासाठी आपण राज्यात निवारागृहे सुरू केली आहेत. त्यात कोणतीही अडचण येणार नाही आणि त्यांना पुरेशा सोयी मिळतील याबाबतदेखील विशेष दक्षता घेतली जाणार आहे. पुढील दहा-बारा दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याने शक्य तेवढ्या अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा उपलब्ध करून घेण्यात येणार आहे.ग्रामीण भागात उपचारासाठी पर्यायकोरोनावर उपचार करण्यासाठी शासनाच्या वतीने शासकीय आणि कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये कोरोना यंत्रणा सज्जता ठेवण्यात आली होती. मात्र, जे सामान्य रुग्ण केवळ हवा बदलामुळे होणाºया सर्दी, खोकला किंवा तापासारख्या नियमित आजारांसाठी कोणत्याही रुग्णालयात जात होते, त्यांना शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात होता. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र, उपकेंद्र, मनपाची रुग्णालये यांच्यातील डॉक्टर, नर्सेस, सहायक कर्मचारी यांच्यावर सामान्य रुग्णांचा ताणदेखील प्रचंड वाढला होता. मात्र, आता शासनाच्या वतीनेच आशा, अंगणवाडी सेविका, होमगार्ड्स यांना प्रशिक्षण देण्याबाबत पुढाकार घेतला जाणार आहे. त्यामुळे जिल्हाभरातील या सेवकांचा उपयोग शासकीय आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा हलका करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.  

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य