अलंगुण शाळेत गुणवंत शिक्षकाचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 06:20 PM2020-11-28T18:20:06+5:302020-11-28T18:21:16+5:30

अलंगुण : राज्य शिक्षक सेना व राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार येथील शहीद भगतसिंग माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय अलंगुण (ता.सुरगाणा) या शाळेतील शिक्षक आर. डी. चौधरी यांचा भगूर नगरपालिकेचे नगरसेवक तथा शिक्षक सेनेचे उपजिल्हाप्रमुख संग्राम करंजकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Honoring of meritorious teacher in Alangun school | अलंगुण शाळेत गुणवंत शिक्षकाचा सत्कार

क्रीडाशिक्षक आर. डी. चौधरी यांचा सत्कार करताना संग्राम करंजकर, हिरामण गावित, पांडुरंग भोये, आर. एच. गांगुर्डे, वसंत बागुल, प्राचार्य आर. के. मोरे, के. एल. वाकचौरे आदींसह शिक्षक कर्मचारी.

googlenewsNext
ठळक मुद्दे नाशिक जिल्ह्यातील व्यक्तींना सलग सहा वर्षांपासून दिला जात असून, सदर पुरस्कार

अलंगुण : राज्य शिक्षक सेना व राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार येथील शहीद भगतसिंग माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय अलंगुण (ता.सुरगाणा) या शाळेतील शिक्षक आर. डी. चौधरी यांचा भगूर नगरपालिकेचे नगरसेवक तथा शिक्षक सेनेचे उपजिल्हाप्रमुख संग्राम करंजकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सदरचा पुरस्कार सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील व्यक्तींना सलग सहा वर्षांपासून दिला जात असून, सदर पुरस्कार राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन निस्वार्थी व प्रामाणिक व्यक्तींची निवड प्रस्ताव न मागविता प्रत्यक्ष केली जाते, अशी माहिती करंजकर यांनी आपल्या मनोगतात दिली. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी शिक्षक नेते आर. एच. गांगुर्डे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थासंचालक हिरामण गावित, खजिनदार पांडुरंग भोये, सुनील करंजकर, अनिल करंजकर, देवीदास करंजकर, दौलत करंजकर, स्कूल कमिटी अध्यक्ष वसंतराव बागुल, प्राचार्य आर. के. मोरे, के. एल. वाकचौरे, मुख्याध्यापक व्ही. जे. जाधव आदींसह शिक्षक व शिक्षकेत्तर उपस्थित होते. यादरम्यान संस्थासंचालक व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बी. के. जाधव यांनी मानले.
 
Web Title: Honoring of meritorious teacher in Alangun school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.