‘देशस्थ’ संस्थेच्या वतीने महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:32 IST2019-03-15T23:25:24+5:302019-03-16T00:32:24+5:30
देशस्थ-ऋग्वेदी संस्थेच्या महिला शाखेच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या तिघा महिलांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

‘देशस्थ’ संस्थेच्या वतीने महिलांचा सन्मान
नाशिक : देशस्थ-ऋग्वेदी संस्थेच्या महिला शाखेच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या तिघा महिलांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डॉ. तेजू, सन्मानार्थी अलका कुलकर्णी, डॉ.राजश्री कुलकर्णी, वैदही देशपांडे, संस्थेच्या अनघा धोडपकर उपस्थित होत्या. यावेळी सन्मानार्थी महिलांना गौरविण्यात आले. यावेळी डॉ. तेजू यांनी आफ्रिकेतील महिलांचे सहजीवन व व्यथा या विषयावर व्याख्यान दिले. प्रास्ताविक कुमुदिनी कुलकर्णी यांनी केले व सूत्रसंचालन सविता कुलकर्णी यांनी केले. प्रारंभी पुलवामा हल्ल्यातील सीआरपीएफच्या शहीद जवानांना तसेच जम्मू-काश्मीरच्या भारतीय सीमेवर झालेल्या लढाऊ हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले नाशिकचे स्क्वॉड्रन लिडर निनाद मांडवगणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.