दिघवद येथे सैनिकांच्या माता -पित्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 17:32 IST2019-01-28T17:31:46+5:302019-01-28T17:32:58+5:30
चांदवड पोलीस स्टेशन, नगरपरिषद ,दिघवद व राजदेरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने दिघवद येथे भारतीय सैन्य दलातील सैनिकांच्या माता पित्यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक संजय पाटील होते.

दिघवद येथे सैनिकांच्या माता -पित्यांचा सन्मान
कार्यक्रमास प्रांत सिध्दार्थ भंडारे, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, उपनिरीक्षक कैलास चौधरी, रामचंद्र जगताप, अनिल केदारे, सरपंच निता मापारी, उपसरपंच अमर मापारी, अर्चना कासलीवाल, चंद्रशेखर कासलीवाल, पुरुषोत्तम बारगळ उपस्थित होते. सीमेवर देशरक्षणाचे कर्तव्य बजावणाऱ्या जवांनाना कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या माता पित्यांचा सन्मान करीत असल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष कासलीवाल यांनी जवानांच्या माता पित्यांचा सन्मान करणे ही अभिमानास्पद बाब असून चांदवड शहरातील माजी सैनिकांची घरपट्टी, नळपट्टी माफ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. सैन्यदलात कार्यरत असलेल्या दिघवद गावातील ५० जवानांच्या माता-पित्यांचा प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह ,वृक्षांचे रोपे देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्तविक उपसरपंच अमर मापारी तर सूत्रसंचालन शांताराम हांडगे यांनी केले. कार्यक्रमास सैन्यदलातील जवान, माता-पिता, निवृत्त सैनिक, पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.