महासंचालक पदक प्राप्त पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:18 IST2019-07-05T23:49:03+5:302019-07-06T00:18:13+5:30

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित २६ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

 The honor of the Police officers received from the Director General | महासंचालक पदक प्राप्त पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव

महासंचालक पदक प्राप्त पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित २६ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी (दि.५) पोलीस दलात सेवा करताना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक प्राप्त पोलीस कर्मचाºयांचा हा सन्मान सोहळा पार पडला.
यावेळी सहायक उपनिरीक्षक राजू साळवे, मनोहर वाघ, शिवाजी देशमुख, पोपट कारवाल, रमेश देशमाने, संजय सूर्यवंशी, हवालदार चंद्रकांत सदावर्ते, दत्तात्रय पाळदे, मधुकर घुगे, माणिक गायकर, सोमनाथ सातपुते, रवींद्र बागुल, नंदू उगले, गणेश भामरे, मोहन कडवे, मनोज विशे, पोपट माळोदे, संजीव जाधव, अनिल दिघोळे, महेबूब सय्यद, कैलास कुशारे, जितेंद्र परदेशी, प्रफुल्ल माळी, दिलीप ढुमणे, पोलीस नाईक संजय सानप, प्रदीप म्हसदे यांचा समावेश आहे.
यावेळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौघुले-श्रींगी, माधुरी कांगणे, सहायक आयुक्त अशोक नखाते, आर. आर. पाटील, ईश्वर वसावे, मोहन ठाकूर आदिंसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title:  The honor of the Police officers received from the Director General