शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

उत्कंठा, बंदोबस्त अन् निकालाचा सन्मान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 1:41 AM

अयोध्या निकालप्रकरणी शहर व परिसरात चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. संवेदनशील भागातील चौकाचौकात राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. तसेच धार्मिक प्रार्थनास्थळांभोवतीही पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशाचा संमजसपणे सन्मान नागरीकांनी राखला. शहरासह जिल्ह्याच्या कायदासुव्यवथेला तडा देणारा कुठलाही अनुचित प्रकार शनिवारी (दि.९) दिवसभरात घडला नाही.

ठळक मुद्देकुठेही अनुचित प्रकार नाही ; नांगरे पाटील, आरती सिंह यांचा प्रत्यक्ष ‘वॉच’

नाशिक : अयोध्या निकालप्रकरणी शहर व परिसरात चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. संवेदनशील भागातील चौकाचौकात राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. तसेच धार्मिक प्रार्थनास्थळांभोवतीही पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशाचा संमजसपणे सन्मान नागरीकांनी राखला. शहरासह जिल्ह्याच्या कायदासुव्यवथेला तडा देणारा कुठलाही अनुचित प्रकार शनिवारी (दि.९) दिवसभरात घडला नाही.शनिवारी (दि.९) सर्वोच्च न्यायालयाने अयोध्याप्रकरणी निकाल दिल्यानंतर सर्वच घटकांनी निकालाचा आदर राखला. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये शांततापूर्ण वातावरण कायम राहिले. जुने नाशिक, वडाळागाव तसेच मालेगाव शहरातही शांततेत समाजबांधवांनी निकालाचे स्वागत केले. सर्व धर्मगुरू, शांतता समिती सदस्य व सुजाण नाशिककरांनी राष्टÑीय एकात्मता जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील तसेच अधीक्षक डॉ. आरती सिंह हे स्वत: पोलीस प्रशासनप्रमुख म्हणून रस्त्यावर उतरले होते. बंदोबस्तावर शहरासह जिल्ह्यात त्यांनी ‘वॉच’ ठेवत वेळोवेळी आढावा घेतला. रविवारी जुने नाशिकसह वडाळागाव, नाशिकरोड, मालेगावमध्येही ईद-ए-मिलादचा सण उत्साहात साजरा होत असून मिरवणुका काढण्यात येणार आहे. मिरवणुकांमध्ये कोणतेही मंडळ डिजेसह सहभागी होणार नसल्याने पोलिसांचा ताण हलका झाला. विशेष म्हणजे नागरिकांनीही व्हॉटसप अप सारख्या सोशल मिडियावर आवास्तव आणि प्रक्षोभक पोस्ट टाकणे टाळले.नागरिकांशी साधला संवाद...नांगरे पाटील, आरती सिंह यांनी बंदोबस्तादरम्यान चौकाचौकात जाऊन शांतता समिती, मोहल्ला समिती सदस्यांशी तसेच अन्य नागरिकांशी संवाद साधला. क ोठेही समाजकं टकांकडून कुठल्याहीप्रकारे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न तर होत नाही ना याचा आढावा जाणून घेत मार्गदर्शन केले. शहर व ग्रामीणमध्ये सुमारे २००पोलीस अधिकारी, ४हजार ५००कर्मचारी, शेकडो होमगार्ड, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील