शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
3
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
4
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
5
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
6
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
7
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
8
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
9
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
10
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
11
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
12
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
13
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
14
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
15
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
16
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
17
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
18
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
19
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
20
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
Daily Top 2Weekly Top 5

हांडे खून प्रकरणी दोघांना जन्मठेप

By admin | Updated: January 13, 2017 01:41 IST

२४ साक्षीदार फितूर : सूक्ष्म तपासाअंती मिळविलेले पुरावे महत्त्वाचे

नाशिक : मखमलाबाद रस्त्यावरील उदय कॉलनी परिसरात मार्च २०१४ मध्ये झालेल्या प्रवीण ऊर्फ समीर हांडे खून खटल्यात जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि. १२) सहा संशयित आरोपींपैकी दोघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मखमलाबाद रस्त्यावरील उदय कॉलनीमध्ये ९ मार्च रोजी मध्यरात्री प्रवीण ऊर्फ समीर हांडे, दुर्गेश गवळी, स्वप्नील पवार हे तिघे गप्पा मारत उभे होते. दरम्यान, सराईत गुन्हेगार तुकाराम चोथे ऊर्फ तुक्या, नीलेश नेरूळकर, पवारला मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी हांडे याने मध्यस्ती करत भांडण सोडविले. दरम्यान, हांडे व पवार दुचाकीवरून जात असताना तुक्या व नेरूलकर यांनी त्यांना रस्त्यात थांबवून भांडणाची कुरापत काढून तुक्याने गावठी पिस्तुलाने गोळी झाडली.
या गोळीबारात हांडेचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात १० मार्च रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी आठवडाभरात सर्व संशयितांना अटक करून न्यायालयापुढे हजर केले होते. दोन वर्षांपासून जिल्हा व सत्र न्यायालयात हा खून खटला सुरू होता. याप्रकरणी गुरुवारी न्यायाधीश उर्मिला फलके - जोशी यांच्या न्यायालयात या खटल्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने आरोपी सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवे व नीलेश नेरूळकर यांना आजन्म सश्रम कारावास व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तुक्याने अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. सरकारपक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसर यांनी कामकाज चालविले. (प्रतिनिधी)