मालेगावी कोरोना व्हायरसची प्रतीकात्मक होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 17:06 IST2020-03-10T17:05:04+5:302020-03-10T17:06:11+5:30
मालेगाव : येथील मालेगाव युवा संघटनेतर्फे कोरोना व्हायरसचे प्रतीकात्मक दहन होळी दहन करण्यात आले. चीनमधून संक्र मण झालेला कोरोना व्हायरस हा मोठा चिंतेचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहे. या आजराला घाबरून न जाता योग्य पद्धतीने त्याचा सामना करण्याची व काळजी घेण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर जनजागृतीचा संदेश देता यावा या उद्देशाने होळीमध्ये कोरोना व्हायरसचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले.

मालेगावी कोरोना व्हायरसची प्रतीकात्मक होळी
मालेगाव युवा संघटनेच्या सदस्यांकडून प्रत्येक भाविकाला संदेश देत प्रत्येकवेळी हाथ स्वच्छ करणे, खोकला आला असता तोंडावर हाथ ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आदी सूचना यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी देवा पाटील, अनिल पाटील, अमित अलई, श्रीकांत उगले, प्रशांत शिरु डे, भरत सिंघवी, द्वारकादास सिंघवी, हितेश सिंघवी, विनोद पहाडे, कमल मूंदडा, निर्मल छाजेड, पप्पू राठी, राजेद्र जाधव, विक्की पाटील, अंकित पिंगळे, आशीष अग्रवाल, पवन छाजेड, सुनील कोतकर, पिंटू हेडा व परिसरातील नागरिक उपस्थित होते.