Video : उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 12:04 IST2019-06-02T11:57:06+5:302019-06-02T12:04:49+5:30
मुंबई कडे जाणारी वाहतून ठप्प झाली असून मोठा अपघात टळला आहे.

Video : उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प
नाशिक : बरेली येथून मुंबई कडे जाणाऱ्या 02062 या धावत्या हॉलिडे एक्स्प्रेसच्या एसी डब्याचे चाक तुटल्याने उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून अनेक एक्स्प्रेस रखडल्या आहेत. मात्र, मोठा अपघात टळला आहे.
नांदगाव रेल्वेस्थानकाजवळ ही घटना आज सकाळी घडली. चाकाचे तुकडे पडल्याने रेल्वेचे दोन डबे घसरले आहेत. यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली असून अद्याप हानी किंवा कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. चाक तुटले तेेव्हा गाडीचा वेग कमी होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळून गाडीतील प्रवाशांचा जीव वाचला.
रेल्वेचे घसरलेले डबे बाजुला करण्यात आले असून यासाठी तीन तास लागले. मात्र, रेल्वे रुळाची पाहणी केल्यानंतरच वाहतूक सुरु केली जाणार आहे. रेल्वेच्या चाकातून मोठा आवाज येत असल्याने रेल्वेच्या कर्मचाऱ्यांंनी पायलटला सांगितले. यानंतर गाडी थांबवून पाहणी केली असता चाक तुटल्याचे समजले.
मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाल्याने उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकल खोळंबल्या आहेत. कामायनी, झेलम, संचखंड, हातिया एक्स्प्रेस रखडल्या असून भुसावळ-मुंबई रेल्वेसेवेवरही परिणाम झाला आहे.