‘त्याच्या’ निर्दयी कत्तलीने सारेच हळहळले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:51 IST2018-09-16T00:50:45+5:302018-09-16T00:51:22+5:30
तो एक आम्रवृक्ष... वृक्ष नव्हे कल्पतरूच... सावली अन् फळे देणारा, त्याचबरोबर आजूबाजूच्या बऱ्या-वाईट समस्त घटनांचा साक्षीदार... जो जुना असला तरी कुटुंबप्रमुखाप्रमाणेच साºयांना सांभाळत रस्त्याच्या कडेला उभा... पण कोणाला त्याचे अस्तित्व खटकले कोणास ठाऊक... एक दिवस कोणीतरी बेमालूमपणे त्याची कत्तल केली आणि दुसºया दिवशी सकाळी तो जागेवर नव्हताच... एवढ्या निर्दयीपणे कोणी आणि कशासाठी तरी असा घाला घालावा... म्हणून सारेच अंचबित तर झालेच.

‘त्याच्या’ निर्दयी कत्तलीने सारेच हळहळले !
नाशिक : तो एक आम्रवृक्ष... वृक्ष नव्हे कल्पतरूच... सावली अन् फळे देणारा, त्याचबरोबर आजूबाजूच्या बऱ्या-वाईट समस्त घटनांचा साक्षीदार... जो जुना असला तरी कुटुंबप्रमुखाप्रमाणेच साºयांना सांभाळत रस्त्याच्या कडेला उभा... पण कोणाला त्याचे अस्तित्व खटकले कोणास ठाऊक... एक दिवस कोणीतरी बेमालूमपणे त्याची कत्तल केली आणि दुसºया दिवशी सकाळी तो जागेवर नव्हताच... एवढ्या निर्दयीपणे कोणी आणि कशासाठी तरी असा घाला घालावा... म्हणून सारेच अंचबित तर झालेच, परंतु होली क्रॉसच्या फादर वेन्सी यांनी त्यांना जाणवणाºया वेदना मांडल्यानंतर आता समविचारी मंडळी एकत्र आली असून, रविवारी (दि.१६) याच ठिकाणी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.
जित्या जागत्या माणसाच्या निधनानंतर त्याला श्रद्धांजली अर्पण केली जाते खरी; परंतु नाशिकमध्ये मात्र वृक्षतोडीमुळे हळव्या झालेल्यांनी शोकसभेचा अपवादात्मक प्रकार रविवारी (दि.१६) होणार आहे. होली क्रॉसच्या चर्चजवळील हा वृक्ष केवळ फळे आणि सावली देणाराच नव्हता तर परिसरात तीन पेट्रोलपंप असताना प्राणवायू देण्यासाठी त्याची भूमिका अधिक महत्त्वाची होती. कोणला अडथळा नसलेले हे झाड कोणाला अडथळा ठरले कोणास ठाऊक परंतु ते तोडण्यात तर आलेच, परंतु महापालिकेच्या परवानगीनेच ही कत्तल करून वृक्षाचे ‘देहदान’ नगरसेविकेकडे करण्यात आल्याचे फादर वेन्सी यांनी सांगितले. महापालिका अशाप्रकारे वृक्षाच्या कत्तलीसाठी परवानगी देईल यावर त्यांचाही विश्वास बसत नाहीये. परंतु राष्टÑ सेवा दलाचा सच्चा सैनिक असलेल्या फादर वेन्सी यांनी व्हॉट्स अॅप पोस्टवरून ही एक पोस्ट समविचारी राष्टÑ सेवा दलाच्या कार्यकर्त्यांना पाठविली. त्यांनाही या भावना रूचल्या आणि आता अशाप्रकारे वृक्षतोड अकारण होऊ नये यासाठी सारेच एकत्रित होऊ लागले. या समविचारी कार्यकर्त्यांनीच शहरात अशाप्रकारे अकारण होणाºया वृक्षतोडीस विरोध करण्याचे ठरवले आणि त्यासाठीच निमित्त ठरवले ते श्रद्धांजली सभेचे. रविवारी (दि.१६) सायंकाळी ही शोकसभा होणार आहे.