हिरावाडीत मुख्याध्यापिकेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 14:22 IST2018-08-09T14:19:59+5:302018-08-09T14:22:16+5:30
नाशिक : हिरावाडीतील मंथन स्वीटसमोरील रस्त्याने पायी जात असलेल्या महिला मुख्याध्यापिकेच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत दुचाकीवर आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना बुधवारी (दि़८) दुपारच्या सुमारास घडली़

हिरावाडीत मुख्याध्यापिकेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचली
नाशिक : हिरावाडीतील मंथन स्वीटसमोरील रस्त्याने पायी जात असलेल्या महिला मुख्याध्यापिकेच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत दुचाकीवर आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना बुधवारी (दि़८) दुपारच्या सुमारास घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या शाळा क्रमांक ८ मधील मुख्याध्यापिका सुनंदा सोमनाथ चौधरी (५१, रा़ अभिजितनगर, हिरावाडी, पंचवटी) या दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास निमाणी येथून रिक्षाने कमलनगर स्टॉपवर उतरल्या़ यानंतर मंथन स्वीटसमोरून घरी पायी जात असताना पावणेचार वाजेच्या सुमारास पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन संशयित पुढे गेले़ यानंतर पुन्हा दुचाकी वळवून जवळ येत पाठीमागे बसलेल्या संशयिताने चौधरी यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीची ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत खेचून ठाकरे स्टेडियमकडे पळून गेले़ चोरटे पांढरे पट्टे असलेल्या ब्राऊन रंगाच्या पल्सरवर आले होते़
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़