हिरावाडीत गवताला आग : दुर्घटना टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:17 IST2018-10-31T00:15:39+5:302018-10-31T00:17:11+5:30
हिरावाडी परिसरातील मोकळ्या जागेत असलेल्या गाजरगवताला मंगळवारी (दि. ३०) दुपारच्या सुमारास आग लागली़ या घटनेनंतर नगरसेवक पूनम मोगरे यांनी तत्काळ पंचवटी अग्निशमन दलाला माहिती काळविल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली.

हिरावाडीत गवताला आग : दुर्घटना टळली
पंचवटी : हिरावाडी परिसरातील मोकळ्या जागेत असलेल्या गाजरगवताला मंगळवारी (दि. ३०) दुपारच्या सुमारास आग लागली़ या घटनेनंतर नगरसेवक पूनम मोगरे यांनी तत्काळ पंचवटी अग्निशमन दलाला माहिती काळविल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हिरावाडी परिसरात पांजरपोळ संस्थेचा मोकळा भूखंड आहे़ मंगळवारी दुपारच्या सुमारास या भूखंडावर असलेल्या गाजरगवताला आग लागली़ तसेच वाºयामुळे आग वाढत गेली व काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण
केले़ या घटनेची माहिती नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ नगरसेवक मोगरे यांना त्याची कल्पना दिली. यानंतर मोगरे यांनी पंचवटी अग्निशामक दलाला फोन करून सदर माहिती कळविल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.