शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण रद्द झाल्याने हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 00:18 IST

ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी (दि.८) १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना कोव्हॅक्सिनचे लसीकरण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या लसीकरणासाठी शासनाने दिलेल्या वेबसाइटवर अनेकांनी रजिस्टर नोंदणी केली. त्यात नाशिक शहरातून अनेकांनी नाव रजिस्टर केले. तेव्हा त्यांना १०० किमीवरून ब्राह्मण गाव हे सेंटर देण्यात आल्याने शनिवारी सकाळी नाशिक, कळवणहून अनेक लाभार्थी लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. मात्र, सदर लसीकरण कार्यक्रम रात्री उशिरा तांत्रिक कारण दाखवून रद्द करण्यात आला. परिणामी, १००/ ५० किलोमीटरहून खासगी वाहनाने आलेल्या या नागरिकांना हिरमोड होऊन लसी न घेताच, माघारी परत जावे लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देब्राह्मणगाव : लसीसाठी १०० किमी प्रवास

ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी (दि.८) १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना कोव्हॅक्सिनचे लसीकरण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या लसीकरणासाठी शासनाने दिलेल्या वेबसाइटवर अनेकांनी रजिस्टर नोंदणी केली. त्यात नाशिक शहरातून अनेकांनी नाव रजिस्टर केले. तेव्हा त्यांना १०० किमीवरून ब्राह्मण गाव हे सेंटर देण्यात आल्याने शनिवारी सकाळी नाशिक, कळवणहून अनेक लाभार्थी लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. मात्र, सदर लसीकरण कार्यक्रम रात्री उशिरा तांत्रिक कारण दाखवून रद्द करण्यात आला. परिणामी, १००/ ५० किलोमीटरहून खासगी वाहनाने आलेल्या या नागरिकांना हिरमोड होऊन लसी न घेताच, माघारी परत जावे लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे.तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना लसीकरण कार्यक्रम प्रथमच जाहीर करण्यात आला. सदर लसीकरण कार्यक्रम हा जिल्हा परिषद गट, तालुका, जिल्हा असा कोणासाठी आहे, हे मात्र जाहीर करण्यात आले नाही. त्यातच पुन्हा सर्वत्र लसीकरणाच्या जागृतीमुळे ज्येष्ठांबरोबर तरुण वर्ग ही लस घेण्यासाठी शासकीय वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करत आहेत व लस घेण्यासाठी उत्सुक आहेत. हे रजिस्टर नोंदणी करताना जवळचे लसीकरण केंद्र रजिस्टर दाखवले गेले पाहिजे. मात्र, अनेकांचे नाव नोदणी करतांना नाशिकहून १०० किलोमीटर दूर अंतर असलेल्या केंद्र रजिस्टर झाल्याने नागरिक नाशिकहून ब्राह्मणगावला सकाळी ८ वाजेपासून उपस्थित राहिले. मात्र, ब्राह्मणगावचे शनिवारी होणारे लसीकरण कार्यक्रम तांत्रिक कारण दाखवून रद्द करण्यात आल्यामुळे सावळा गोंधळ झाल्याचे चित्र दिसून आले. वार्ड, शहर, तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र नुसार लसीकरण नाव नोंदणी होणे गरजेचे आहे, जेणेकरून नागरिकांना कोठेही नाहक हेलपाटे मारायला लागणार नाही. याबाबत संबंधित आरोग्य खात्याने याबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.लसीकरणसाठी शासनाने दिलेल्या वेबसाइटवर रजिस्टर नोंदणी करताना, ब्राह्मणगाव हे सेंटर दिल्याने आम्ही एवढ्या दूरवर आलो. मात्र, येथे लसीकरण कार्यक्रम रद्द झाल्याने आम्हाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला.- संजय कोपरगावकर, नाशिक.लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण मोहीम रद्द करावी लागली. नागरिकांनी लसीसाठी नाव नोंदणी करताना जवळचे लसीकरण केंद्र निवड करावे.- डॉ.राहुल कांबळे, वैद्यकीय अधिकारी, ब्राह्मणगाव.(०८ ब्राह्मणगाव)लसीअभावी बंद असलेले ब्राह्मणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतhospitalहॉस्पिटल