शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

अडथळे नसलेल्या मोटारींची ‘उचलेगिरी’

By admin | Updated: April 1, 2017 00:48 IST

नाशिक : शहरात कोठेही नो पार्किंगचे फलक नाही, त्यामुळे वाहने कोठे लावावी अशी अडचण असतानाच मोटारी उचलणाऱ्या ठेकेदारांचे हेच फावले असून, वाहतुकीला अडथळा न ठरलेली वाहने उचलली जात आहेत.

नाशिक : शहरात कोठेही नो पार्किंगचे फलक नाही, त्यामुळे वाहने कोठे लावावी अशी अडचण असतानाच मोटारी उचलणाऱ्या ठेकेदारांचे हेच फावले असून, वाहतुकीला अडथळा न ठरलेली वाहने उचलली जात असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.वाहतूक पोलिसांनी सुरू केलेली मोटारी उचलण्याची मोहीम वारंवार वादग्रस्त ठरली आहे. शहरात कोठेही वाहनतळे नाहीत की सम-विषम तारखांना मोटारी लावण्याची व्यवस्था नाही, अशा स्थितीत मोहीम सुरू करण्यास नागरिकांचा विरोध होता. मात्र, तरीही माजी पोलीस आयुक्त जगन्नाथन यांनी हट्टाने मोटार टोर्इंग सुरू केली. ही मोहीम सुरू झाली तेव्हापासून वाद सुरूच असून, नागरिकांची अकारण पिळवणूक केली जात आहेत, अशा तक्रारी आहेत.  शहरात वाहनतळाची सोय नसल्याने त्यास विरोध होत असताना जगन्नाथन यांनी ही मोहीम बळजबरी सुरू केली आणि त्याचा त्रास आजही शहरवासीयांना होत आहे. शहरात रस्त्याच्या कडेला अगदी कोणालाही त्रास होत नाही अशा पद्धतीने दुचाकी किंवा अन्य मोटार उभी केली की ती तत्काळ उचलली जाते. त्याबाबत ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना कितीही सांगून उपयोग होत नाही. बरे तर ही मोहीम केवळ शहराच्या काही भागांतच असून, जेथे खरोखरीच बेशिस्त पद्धतीने वाहने उभी आहेत, अशा अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांची कारवाईच होत नाही. वाहतूक सुधारण्याच्या नावाखाली ही अकारण अडवणूक सुरू असून, आधी वाहनतळांसाठी जागा निश्चित कराव्या आणि मगच वाहने उचलावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)‘नो पार्किंग’चा फलक नसताना उचलेगिरीमाझी मोटार पंडित कॉलनीत वाहतुकीला अडथळा न करता उभी करण्यात आली होती. मी माझे काम उरकून संबंधित व्यापारी संकुलाखाली गेलो तेव्हा मोटार गायब होती आणि ती टोर्इंग करून नेल्याचे सांगण्यात आले. मी संबंधित कार्यालयात गेल्यानंतर कोणताही पुरावा न देता मोटार चुकीच्या ठिकाणीच उभी केल्याचे सांगण्यात आले. नो पार्किंगचा फलक नसताना कायदेशीरदृष्ट्या ही मोटार चुकीच्या ठिकाणी उभी होती असे कसे म्हणता येईल? तरीही माझ्याकडून २७० रुपये घेण्यात आले. - रवींद्र अदयप्रभू,  रहिवासी पंचवटी