भाडेतत्त्वावरील वाहनांचा अपहार करणारे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 01:14 AM2019-11-20T01:14:40+5:302019-11-20T01:15:33+5:30

वाहने भाडेतत्त्वावर घेत करारनामा करून विश्वास संपादन करत घेतलेली वाहने परस्पर गहाण ठेवून रोख रक्कम मिळवून वाहनांचा अपहार करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट-१च्या पथक ाने तीन वर्षांपूर्वीच पर्दाफाश केला होता. या गुन्ह्यात फरार असलेल्या दोघा उपएजंटांच्या मुसक्या बांधण्यास पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून गहाण ठेवलेली सुमारे ५ वाहने जप्त करण्यात आली आहे.

Hijacker | भाडेतत्त्वावरील वाहनांचा अपहार करणारे गजाआड

भाडेतत्त्वावरील वाहनांचा अपहार करणारे गजाआड

Next
ठळक मुद्देगुन्हे शाखा : २९ लाखांच्या पाच चारचाकी जप्त

नाशिक : वाहने भाडेतत्त्वावर घेत करारनामा करून विश्वास संपादन करत घेतलेली वाहने परस्पर गहाण ठेवून रोख रक्कम मिळवून वाहनांचा अपहार करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट-१च्या पथक ाने तीन वर्षांपूर्वीच पर्दाफाश केला होता. या गुन्ह्यात फरार असलेल्या दोघा उपएजंटांच्या मुसक्या बांधण्यास पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून गहाण ठेवलेली सुमारे ५ वाहने जप्त करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गेल्या तीन वर्षांपासून अशोकामार्ग पखालरोड भागात राहणारे संशयित इसम आवेश जिलानी कोकणी व फरहाण जिलानी कोकणी यांनी बनावट टुर्स-ट्रॅव्हल्सचे क ार्यालय असल्याचे सांगून लोकांकडून भाडेतत्त्वावर वाहने घेत त्याचा करारनामा करत परस्पर उपएजंटाद्वारे मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन गहाण ठेवत मूळ मालकाला वाहने परत न करता अपहार के ल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना यापूर्वीच अटक केली आहे. त्यांनी मूळ मालकासोबत वाहनाचे दरमहा भाडे ठरवून ती वाहने नाशिकमधील उपएजंट सॅमसन प्रवीण पारखे याच्याकडून मोठी रक्कम घेत गहाण ठेवल्या.
पोलिसांनी एकूण ५ वाहने हस्तगत केली आहे. तसेच कोकणी जोडगोळीकडून २०१७ साली सुमारे १२ चारचाकी वाहने हस्तगत करून मूळमालकांना परत केले आहेत.
पारखे याने गहाण ठेवलेली वाहने धुळे येथील संशयित भूषण सुर्वे याच्यामार्फत त्याच्या ओळखीच्या लोकांना देत त्यांच्याकडून मोठी रोख रक्कम घेतल्याचे तपासात पुढे आले. या गुन्ह्याचा तपास करत गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने संशयित भुºया उर्फ भूषण राजेंद्र सुर्वे (रा. जुने धुळे), जेलरोडवर राहणारा त्याचा साथीदारा पारखे यास अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गहाण स्वरूपात ठेवलेल्या विविध कंपन्यांच्या सुमारे २८ लाख ९० हजार रुपये किमतीच्या चारचाकी वाहने दडवून ठेवल्याची कबुली दिली.

Web Title: Hijacker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.