आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:56 IST2018-08-13T22:47:22+5:302018-08-13T22:56:02+5:30
येवला तालुक्यातील शिवाजीनगर (तळवाडे) येथील जि. प. शाळेत मानव उत्थान सेवा समिती शाखा मनमाडतर्फेएज्युकेशन मोहिमेंतर्गत गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना कपडे, वह्या, लेखन साहित्य तसेच फळांचे वाटप करण्यात आले.

आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा हात
प्रमुख अतिथी पूज्य मुक्तिका बाईजी यांनी सतपाल महाराज यांच्या साधकांमार्फत मानव उत्थान सेवा समितीच्या देशभर चाललेल्या शैक्षणिक कार्याची माहिती दिली. तसेच सत्याच्या मार्गाने चालण्याचा व गरिबीमुळे अर्धवट शिक्षण न सोडण्याचा मौलिक मंत्र विद्यार्थ्यांना दिला. विलास बांगर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी मानव उत्थान सेवा समितीचे आनंता भामरे, शुभम आहेर,
रुपाली भामरे, सचितानंद गांगुर्डे, धनश्री गोवर्धने, दीपक आहेर तसेच बाळनाथ आरखडे, शिवम कुºहे, शंकर आरखडे, रवींद्र
आरखडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. गणेश घोडसरे यांनी आभार मानले.