निफाड कारखान्यावर विक्रीकर खात्याची टाच

By Admin | Updated: October 9, 2015 01:31 IST2015-10-09T01:30:50+5:302015-10-09T01:31:45+5:30

निफाड कारखान्यावर विक्रीकर खात्याची टाच

The heel of the sales tax department on the Nifed factories | निफाड कारखान्यावर विक्रीकर खात्याची टाच

निफाड कारखान्यावर विक्रीकर खात्याची टाच

  नाशिक : आर्थिक डबघाईस आलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी खासगी व्यक्तीला भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याची तयारी एकीकडे प्रशासक मंडळ व माजी संचालकांनी चालविलेली असतानाच, दुसरीकडे हा कारखाना आणखीनच गर्तेत सापडला असून, गेल्या अनेक वर्षांपासून कारखान्याने विक्री कराचा, तसेच व्हॅटचा भरणा न केल्याने थकीत कोट्यवधी रुपयांच्या वसुलीसाठी विक्रीकर विभागाने कारखान्याच्या जंगम व स्थावर मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे. विठेवाडी येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बॅँकेने जप्तीची कार्यवाही केल्याने व नाशिक सहकारी साखर कारखान्याचीही त्याच दिशेने वाटचाल सुरू असताना निफाड कारखान्यावरही अशा प्रकारची नामुष्की ओढवल्याने जिल्'ातील सहकार क्षेत्र मोडकळीस निघते की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. साधारणत: १९९५ पासून निफाड कारखान्याने ऊस खरेदी कर, तसेच कारखान्यातून निर्मित होणारी दारू, स्पिरीटची विक्री केल्यानंतर त्यावरील कराचाही भरणा वेळोवेळी केलेला नाही. विक्रीकर विभागाने यासंदर्भात कारखान्याशी पत्रव्यवहार करून पैशांची मागणी केली; परंतु कारखान्याचीच आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर विक्रीकर विभागाच्या अपर आयुक्त श्रीमती चित्रा कुलकर्णी यांनी थकबाकी वसुलीसाठी जमीन महसूल कायदा १९६६ अंतर्गत जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोनच दिवसांपूर्वी कारखान्यातील डिस्टलरी विभाग, कॅल्शियम लॅक्टेट विभाग, कंपोस्ट प्रकल्प, लगुन्स, ई.टी.पी. विभाग, बायोगॅस प्रकल्प व इतर यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. याचबरोबर कारखान्याच्या मालकीच्या बारा जमिनींच्या सातबारा उताऱ्यावरही बोझा चढविला आहे.

Web Title: The heel of the sales tax department on the Nifed factories