शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

लोकवस्तीतून अवजड वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 11:58 PM

द्वारका चौकातून अवजड वाहनांची वाहतूक बंद करून अन्यत्र मार्गाने वळविण्यात आल्याने पुणे महामार्गाकडून येणारी अवजड वाहने वडाळा-पाथर्डी रस्त्याने मार्गक्रमण करू लागली आहेत. त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. लोकवस्तीतून होणारी अवजड वाहनांची वाहतूक तातडीने बंद करावी अन्यथा ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.

ठळक मुद्देअपघाताची भीती : नवीन वाहतूक व्यवस्थेमुळे अंतर्गत रस्त्यांवर वाढला धोका

इंदिरानगर : द्वारका चौकातून अवजड वाहनांची वाहतूक बंद करून अन्यत्र मार्गाने वळविण्यात आल्याने पुणे महामार्गाकडून येणारी अवजड वाहने वडाळा-पाथर्डी रस्त्याने मार्गक्रमण करू लागली आहेत. त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. लोकवस्तीतून होणारी अवजड वाहनांची वाहतूक तातडीने बंद करावी अन्यथा ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.महापालिकेने लाखो रु पये खर्च करून वडाळानाका ते पाथर्डीगाव दरम्यान नागपूरच्या धर्तीवर दोन टप्प्यात रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्यात आले. या रस्त्यावर विनयनगर, इंदिरानगर, साईनाथनगर, सार्थकनगर, कलानगर, पांडवनगरी, शरयूनगर, समर्थनगर यांसह विविध उपनगरे आहेत. त्यामुळे अंबड औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. तसेच या रस्त्यालगतच प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालय असल्याने दिवसभर शेकडोच्या संख्येने विद्यार्थ्यांची वर्दळ सुरू असते. परिसरात सुमारे ६० टक्के ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. चालणे हा शरीरासाठी उत्तम व्यायाम असल्याने सकाळी व सायंकाळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक वडाळा-पाथर्डी रस्त्यावर फेरफटका मारण्यासाठी निघतात. परंतु अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघाताच्या शक्यतेने ज्येष्ठ नागरिकांची धडकी भरत आहे.वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा जयवंत मोरे, दत्तात्रय पोटिंदे, सदाशिव उगले, रमेश नागरे, बाबूराव पाटील, वाल्मीक हिरे, पंडित बडगुजर, दिलीप चव्हाण, सुभाष बेंडाळे, वसंतराव शिंदे, वसंत वझरे, परशुराम निकम यांसह ज्येष्ठ नागरिकांनी दिला आहे.रस्त्यावरून मार्गक्रमण करणे अवघडवडाळा-पाथर्डी रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यासाठी परिसरातून विरोध होत आहे. त्याची दखल घेऊन पोलीस आयुक्तांना सर्व नगरसेवक आणि नागरिक भेटून निवेदनाद्वारे तातडीने अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी करण्यात आली. या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता लोकवस्तीतून गेल्या सहा दिवसांपासून द्वारका चौकातून निर्बंध घालण्यात आलेले मालट्रक, ट्रेलर, कंटेनर, टॅँकरची वाहतूक या रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, पादचारी व वाहनधारकांना रस्त्यावरून मार्गक्र मण करणे जिकिरीचे झाले आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस