शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

भगूर, इंदिरानगर, सातपूरसह शहरात जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 18:22 IST

पावसाचे पाणी खड्डयांमध्ये साचले होते. यामुळे नागरिकांना खड्डयांचा अंदाज बांधणे कठीण झाले होते. बहुतांश वाहनचालकांना खड्डयांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यातून वाट काढावी लागली.

ठळक मुद्देउपनगरीय भागात जोरदार सरी कोसळल्या.कमाल तापमान ३१अंशावर; किमान तापमान २२अंशापर्यंत घरी परतणाऱ्या शाळकरी मुलांचे हाल

नाशिक : शहर व परिसरात बुधवारी (दि.२५) दुपारी जोरदार पाऊस झाला. दुपारी तीन वाजेनंतर शहरासह उपनगरीय भागांमध्ये ढग दाटून आल्याने जणू अंधार पडला होता. काही मिनिटांतच दमदार सरींचा वर्षाव सुरू झाल्याने रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहिले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पाऊस सुरू असल्याने सायंकाळी घरी परतणाऱ्या शाळकरी मुलांचे हाल झाले.मागील दोन दिवसांपासून शहराच्या वातावरणात उकाडा जाणवत आहे. बुधवारीही सकाळपासून दुपारपर्यंत उष्मा कायम होता. दुपारी ढगाळ हवामान तयार झाल्यानंतर थंड वारा सुटला अन सरींच्या वर्षावाला सुरूवात झाली. उपनगर, द्वारका, जुने नाशिक, पंचवटी, वडाळागाव, इंदिरानगर, पाथर्डी, सातपूर या उपनगरीय भागात जोरदार सरी कोसळल्या. देवळाली कॅम्प, भगूर परिसरात सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला सुमारे दीड तास पावसाने या उपनगरांना झोडपले. शहराच्या सीबीएस, शालिमार, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, एमजीरोड, गंगापूररोड, शरणपूररोड, चांडक सर्कल, मुंबईनाका, कॉलेजरोड या मध्यवर्ती परिसरातदेखील जोरदार सरी सुमारे पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ कोसळल्या.शहरांसह उपनगरीय भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून महापालिका प्रशासनाकडून डांबरीकरण करण्यात न आल्यामुळे पावसाचे पाणी खड्डयांमध्ये साचले होते. यामुळे नागरिकांना खड्डयांचा अंदाज बांधणे कठीण झाले होते. बहुतांश वाहनचालकांना खड्डयांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यातून वाट काढावी लागली. पेठरोडवरील हवामान निरिक्षण केंद्राच्या परिसरात पाच वाजेपासून पावसाला सुरूवात झाली. अर्ध्यातासांत या भागात ६ मि.मी इतक्या पावसाची नोंद होऊ शकली. मंगळवारी (दि.२४) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पेठरोड हवामान निरिक्षण केंद्राच्या परिसरात ९.५ मि.मीपर्यंत पाऊस मोजण्यात आला होता.कमाल तापमान ३१अंशावरदोन दिवसांपासून शहरात पुन्हा दररोज दुपारी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे कमाल तापमानाचा पारा घसरण्यास मदत होईल असे वाटत होते; मात्र बुधवारी कमाल तापमान ३१ अंश इतके नोंदविले गेले. मंगळवारी कमाल तापमानाचा पारा २४अंशापर्यंत खाली घसरला होता. अचानकपणे मध्यरात्रीपासून ढगाळा हवामान दाटून आल्याने पुन्हा उष्मा वाढण्यास सुरूवात झाली. बुधवारी सायंकाळपर्यंत ३१ अंशापर्यंत कमाल तापमान तर २२ अंशापर्यंत किमान तापमानाची नोंद झाली.खड्डयांमध्ये साचले पावसाचे पाणीकॅनडा कॉर्नर ते आंद्रीया चर्च रस्ता, नाशिक-पुणे महामार्ग, त्रिमुर्ती-कामटवाडे रस्ता, आंबेडकर चौक-वडाळारोड, पंचवटी, जुना आडगावनाका, हिरावाडी, सातपूर-अंबड लिंकरोड, देवळाली कॅम्प लॅमरोड, द्वारका चौफू ली, अशोकामार्ग, वडाळागाव आदि भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची चाळण झाली आहे. येथील खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहने खडडयांत जाऊन आदळताना पहवयास मिळाले. जोरदार पावसाने थातुरमातुर पध्दतीने बुजविण्यात आलेल्या खड्डयांमधील मुरूम-माती वाहून गेली असून परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसweatherहवामान