वणी परिसरात जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:28 IST2019-10-19T00:27:43+5:302019-10-19T00:28:06+5:30

वणी : शहरासह परिसरात शुक्रवारी (दि. १८) जोरदार पाऊस झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास जोराचे वारे वाहू लागले होते.

Heavy rain in the Wani area | वणी परिसरात जोरदार पाऊस

वणी परिसरात जोरदार पाऊस

ठळक मुद्देकांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ


वणी : शहरासह परिसरात शुक्रवारी (दि. १८) जोरदार पाऊस झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास जोराचे वारे वाहू लागले होते. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पावसास सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे टमाटा विक्री करण्यासाठी आलेल्या उत्पादकांची तारांबळ उडाली, तर विक्रीसाठी आणलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ झाली. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे पुन्हा आलेल्या पावसाने हातातोंडातील घास हिरावून नेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title: Heavy rain in the Wani area