शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कळवण तालुक्यात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 00:52 IST

अभोणा : अभोणा शहरासह संपूर्ण तालुक्यात शनिवार (दि१९)साडेनऊच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला.सुमारे दिड ते दोन तास टपोऱ्या थेंबांसह संततधार कायमहोती.त्यामुळे नदी- नाल्यांना पुर आले. सोसाट्याचा वारा,जोरदार पावसाने वीज पुरवठा खंडीत झाल्याने अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते.

ठळक मुद्देनद्यांना पुर : चणकापूर मधून पुन्हा विसर्ग सुरु

अभोणा : अभोणा शहरासह संपूर्ण तालुक्यात शनिवार (दि१९)साडेनऊच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला.सुमारे दिड ते दोन तास टपोऱ्या थेंबांसह संततधार कायमहोती.त्यामुळे नदी- नाल्यांना पुर आले. सोसाट्याचा वारा,जोरदार पावसाने वीज पुरवठा खंडीत झाल्याने अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाने तालुक्यात काढणीला आलेला मका,बाजरी, भुईमूग,सोयाबीन ही पिके पूर्णत:वाया गेली. काही ठिकाणी कांद्याचे रोप व लागवड केलेल्या लाल कांद्याचे पिक वाया गेले. मुसळधारेने तालुक्यासह कसमादेसाठी वरदान ठरलेले चणकापूर, पुनंद(अर्जुनसागर) धरणांमध्ये क्षमतेएवढा पाणी साठा झाला आहे.कालरात्री चणकापूर मधून गिरणा नदीपात्रात ९०८क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात आला. चणकापूर उजव्या कालव्याद्वारे १२० क्युसेकने विसर्ग सुरूच आहे. गिरणापात्रातून २०हजार ९११ क्सुसेक,तर उजव्या कालव्याद्वारे ३०३१ क्सुसेक विसर्ग करण्यात आला आहे. तर पुनद प्रकल्पातून ६८०क्युसेकने विसर्ग सुरू असून आतापर्यंत ३१हजार ७१६ क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.त्याच बरोबर तालुक्यातील (कंसात क्षमता दलघफूमध्ये) धनोली (१७३),भेगू (९७),गोबापूर (७९), मळगाव(९९),बोरदैवत (६९),मार्कंडपिंप्री (४०),धार्डेदिगर(३३)खिराड (४०),ओतुर(९७),भांडणे (५३),जामलेवणी (६३) यासह तालुक्यातील सर्व पाझरतलाव १०० टक्के भरून ओसंडून वाहू लागले आहेत यंदाच्या दमदार पावसाने गिरणाकाठावरील ५१ तर पुनंद काठावरील ३१ अशा ८२ गावाच्या पाणीपुरवठा योजनांना संजीवनी मिळाली असून आगामी वर्षाचा पाणीप्रश्न तसेच शेती सिंचनाची समस्या दूर झाली आहे. काल रात्रीत तालुक्यात कळवण येथे सर्वाधिक (७९) त्या खालोखाल नवीबेज(६७),मोकभणगी (६६),अभोणा (५२), कनाशी (५१)व दळवट येथे(३९) मिमी पाऊसाची नोंद झाली आहे.

 

टॅग्स :RainपाऊसRural Developmentग्रामीण विकास