नाशिक जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 20:39 IST2024-05-10T20:38:49+5:302024-05-10T20:39:00+5:30

- चांदवडला पावसामुळे घरांचे नुकसान

Heavy rain in some parts of Nashik district | नाशिक जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस

नाशिक जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस

संजय पाठक, नाशिक-  शहरासह जिल्ह्याच्या काही भागात आज दुपारनंतर अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी या पावसामुळे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. चांदवड तालुक्यात कानमांडळे गावात वादळी वाऱ्यामुळे दहा ते बारा घरांचे नुकसान झाले आहे. तर वीज कोसळून एक गाय ठार झाली. सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथेही जोरदार पावसाने झोडपून काढले. नाशिक शहरात आणि तालुक्यातही अनेक भागात पावसाने हजेरी लावली. भगूर, सिद्धपिंप्री भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. अचानक झालेल्या पावसामुळे नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित झाला आहे.

Web Title: Heavy rain in some parts of Nashik district

टॅग्स :Nashikनाशिक