शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:26 IST

नाशिक शहरासह जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे; मात्र गंगापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला.

नाशिक शहरासह जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे; मात्र गंगापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला. यामुळे धरण ६१.८७टक्के भरल्याने विसर्गात सोमवारी (दि.२३) दुपारी दोन वाजता दुपटीने वाढ करण्यात आली. ६ हजार १६०क्युसेक इतका विसर्ग गोदावरीत सोडण्यात आला आहे. गाेदावरीला पुन्हा पुरसदृश्य स्थिती सायंकाळी चार वाजेपर्यंत निर्माण झाली होती.

नाशिक शहरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यात मात्र पावसाचा जोर टिकून आहे. गंगापुर धरणात पाणलोटक्षेत्रातून सकाळी सहा वाजेपर्यंत मागील २४ तासांत १६१दलघफु इतकी पुरपाण्याची नवीन आवक झाली. पाणलोट क्षेत्रातील आंबोलीमध्ये ७२ तर त्र्यंबकेश्वरला ३५ आणि गौतमी गोदावरी परिसरात ३० मिमी इतका पाऊस सकाळी सहा वाजेपर्यंत मोजण्यात आला. दिवसभर पावसाची संततधार पाणलोट क्षेत्रात कायम असल्याने जलसंपदा विभागाकडून विसर्गात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

दुपारी एक वाजेच्या सुमारास याबाबत सावधानतेचा इशारा जाहीर करण्यात आला. दुपारी दोन वाजता विसर्ग ३ हजार ९४४ वरून ६ हजार १६०क्युसेक इतका करण्यात आला. यामुळे दुपारी चार वाजेपर्यंत गोदावरी नदीला पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. रामकुंडात होळकर पुलाखालून ७ हजार २०४ क्युसेक इतके पाणी प्रवाहित झाले होते. 

नाशिककरांचे पारंपरिक पुरमापक असलेल्या दुतोंड्या मारूतीची मुर्ती कंबरेपर्यंत बुडाली. रामकुंडावरील गंगा-गोदावरी प्राचीन मंदिरालाही पाण्याचा वेढा पडला आहे. बाणेश्वर मंदिरासह सिद्ध पाताळेश्वर मंदिर पाण्यात बुडाले आहे. तसेच गोदावरी नदीवरील नारोशंकर मंदिराजवळ असलेला सर्वात कमी उंचीचा ‘रामसेतू’ला पुराचे पाणी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास लागले. यामुळे गोदाकाठी असलेल्या विक्रेत्यांनी आवरासावर करत स्थलांतर केले.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिकgodavariगोदावरी