लासलगावी पावसाची जोरदार बॅटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 18:14 IST2020-06-29T18:14:28+5:302020-06-29T18:14:42+5:30

विंचुर रोडवरील अनेक दुकानात पाणी घुसले

Heavy batting of Lasalgaon rain | लासलगावी पावसाची जोरदार बॅटिंग

लासलगावी पावसाची जोरदार बॅटिंग

ठळक मुद्देपावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना सुखद दिलासा

लासलगाव : सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास एक तास पावसाने जोरदार बॅटींग केली. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन गारवा निर्माण झाल्याने उष्णतेने व्याकुळ झालेल्या शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले. पावसामुळे विंचुर रोडवरील अनेक दुकानात पाणी घुसले तर इंगळे इलेक्ट्रॉनिक यांच्या दुकानात पाणी घुसल्याने विजेच्या सामानाचे नुकसान झाले.
गेल्या काही दिवसापासून पावसाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांची बियाणे, खते घेण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. सोमवारी झालेल्या पावसाने प्रामुख्याने पेरणी झालेल्या सोयाबीन तसेच मका या पिकाला मोठा फायदा होणार आहे . गेल्या तीन महिन्यांपासून लासलगावकर प्रचंड उकाड्याने हैराण झाले होते. त्यात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना सुखद दिलासा मिळाला.

Web Title: Heavy batting of Lasalgaon rain