हृदयद्रावक! इगतपुरी तलावात बुडून दोन भाच्यांसाह मामाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 15:56 IST2023-02-18T15:55:46+5:302023-02-18T15:56:30+5:30
Crime News: इगतपुरी येथील नगरपरिषद तलाव परिसरात फिरायला गेलेल्या तीन जणांचा तळ्यात बुडून मृत्यू झाला.

हृदयद्रावक! इगतपुरी तलावात बुडून दोन भाच्यांसाह मामाचा मृत्यू
गणेश घाटकर -
इगतपुरी - येथील नगरपरिषद तलाव परिसरात फिरायला गेलेल्या तीन जणांचा तळ्यात बुडून मृत्यू झाला. सदर घटनेची माहीती स्थानिक नागरिकांना समजताच , नगरपरीषद कर्मचारी, नागरिक,जनसेवा प्रतिष्ठान कार्यकर्त्यांनी तलावातून बाहेर काढण्यास मदत केली. यावेळी ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती. ग्रामीण रुग्णालयात तिघानाही आणले असता डॉक्टरानी तिघानाही मृत घोषित केले. भिवंडीहून आलेल्या दोन सख्या भावांचा यात समावेश आहे तर वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचा देखील यात मृत्यू झाला आहे. व्हेंटिलेटर आणि आयसीयूची सुविधा नसल्यामुळे मृत्यु झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. याचा निषेध म्हणून इगतपुरी ग्रामीण रुग्णालय समोर कुटुंबीयांनी ठिय्या आंदोलन केल होते. त्यामुळे परिसरात काहीवेळ तणावाच वातावरण निर्माण झाल होते.