युवकाच्या खुनाचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:18 IST2018-06-05T00:18:16+5:302018-06-05T00:18:16+5:30

चाडेगाव येथे दारणा नदीपात्रात आठ दिवसांपूर्वी अनोळखी युवकाचा खून करून टाकण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात अद्याप नाशिकरोड पोलिसांना यश न आल्याने खुनाचे गूढ गुलदस्त्यात आहे.

 The heart of the young man remains intriguing | युवकाच्या खुनाचे गूढ कायम

युवकाच्या खुनाचे गूढ कायम

नाशिकरोड : चाडेगाव येथे दारणा नदीपात्रात आठ दिवसांपूर्वी अनोळखी युवकाचा खून करून टाकण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात अद्याप नाशिकरोड पोलिसांना यश न आल्याने खुनाचे गूढ गुलदस्त्यात आहे.  चाडेगाव काशाआई मंदिराजवळ दारणा नदीपात्रात एका ३० वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह आठ दिवसांपूर्वी गेल्या सोमवारी पाण्यावर तरंगताना आढळून आला होता. याप्रकरणी प्रारंभी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मृतदेहाच्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर दोन दिवसांनी नाशिकरोड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मयत युवकाच्या उजव्या गालावर, पाठीमागे, डोक्यात मानेजवळ, कानाखाली वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले होते. खुनाच्या घटनेला आठ दिवस उलटूनही मयत युवकाची ओळख पटविण्याचे गूढ अद्याप खुलदस्त्यात आहे.
खून झालेल्या युवकाची ओळख न पटल्याने खुनाचे कारण व संशयित आरोपी यांच्यापर्यंत पोलिसांना पोहचणे अवघड झाले आहे. त्यामुळे खुनाचे कारण व संशयित ओरीपीपर्यंत पोहचणे पोलिसांना अवघड होऊन बसले आहे.

Web Title:  The heart of the young man remains intriguing