मतदानासाठी आरोग्य व्यवस्था सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:30 IST2019-10-20T23:05:20+5:302019-10-21T00:30:43+5:30
शहरात मतदानाची तयारी जोमाने सुरू असून, त्यात आरोग्याच्या अडचणी उद््भवू नये यासाठी महापालिकेच्या वतीने मतदान केंद्राच्या ठिकाणी विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी आरोग्य पथके तैनात ठेवण्यात आली असून, सहा रुग्णालये आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे.

मतदानासाठी आरोग्य व्यवस्था सज्ज
नाशिक : शहरात मतदानाची तयारी जोमाने सुरू असून, त्यात आरोग्याच्या अडचणी उद््भवू नये यासाठी महापालिकेच्या वतीने मतदान केंद्राच्या ठिकाणी विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी आरोग्य पथके तैनात ठेवण्यात आली असून, सहा रुग्णालये आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे.
मतदान केंद्रांवर मतदारांसाठी अनेक सुविधा देण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. मतदान केंद्रांवर येणारे मतदार विशेषत: ज्येष्ठ नागरिक यांना ऐनवेळी त्रास होऊ शकतो. कित्येकदा कर्मचाऱ्यांना देखील ताण येऊन प्रकृती बिघडण्याच्या घटना घडत असतात. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आरोग्य सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक महापालिकेच्या आरोग्य पथकानेदेखील सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
प्रत्येक मतदान केंद्रांवर चार कर्मचाऱ्यांचे एक याप्रमाणे आरोग्य पथके असणार आहेत. त्यांच्याकडे औषधांचा साठादेखील देण्यात आला आहे.
बिटको, दसक पंचक, जुन्या नाशकात झाकीर हुसेन, सिडकोत श्री स्वामी समर्थ, सातपूर येथे मायको रुग्णालय, पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय आदी रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली असून, या सर्व ठिकाणी एकेक रग्णवाहिका तैनात असेल.