आश्रमशाळेचा मुख्याध्यापक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

By Admin | Updated: January 20, 2016 22:30 IST2016-01-20T22:29:52+5:302016-01-20T22:30:28+5:30

छायाचित्रकाराची अडवणूक : लाच घेताना अटक

The headmaster of the ashram school 'Lachchouchpat' | आश्रमशाळेचा मुख्याध्यापक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

आश्रमशाळेचा मुख्याध्यापक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

नाशिक : आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सहायक प्रकल्प अधिकारी तथा देवरगावच्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक दादा भगवान जाधव यांनी छायाचित्रांच्या बिलाची रक्कम मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार छायाचित्रकाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली
होती.
कमिशन म्हणून २९०० रुपयांची लाच छायाचित्रकाराकडून स्वीकारताना मंगळवारी (दि.१९) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून जाधव यांना रंगेहाथ कार्यालयातच पकडले.
देवरगाव येथील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक म्हणून जाधव
कार्यरत आहे. शाळेमध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे छायाचित्रे काढणाऱ्या छायाचित्रकाराक डे
त्यांनी बिलाची रक्कम मंजूर करून दिली म्हणून कमिशनपोटी पाच हजार रुपयांची मागणी केली
होती.
दहावीच्या परीक्षेस बसलेल्या परीक्षार्थींचे काढलेल्या छायाचित्रांच्या बिलाची रक्कम मंजुरीनंतर जाधव यांनी धनादेशाद्वारे छायाचित्रकाराला अदा केली. त्यामुळे जाधव यांनी या मोबदल्यात कमिशन म्हणून पाच हजार रुपये तक्रारदाराकडे मागितले होते; मात्र तडजोडीनंतर दोन हजार ९०० रुपये देण्याचे निश्चित झाले. त्यावरून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जाधव यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्याच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी सापळा रचला. शहरातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कायर् $िालयात दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडून निश्चित झालेल्या रक्कमेची लाच घेताना अधिकाऱ्यांनी जाधव यांना रंगेहाथ पकडले. (प्रतिनिधी)

Web Title: The headmaster of the ashram school 'Lachchouchpat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.