शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

पाच रुपयांसाठी मोजले ‘त्याने’ पाचशे रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:54 IST

केवळ पाच रुपयांच्या नाण्यासाठी ‘त्याने’ आजवर अनेकदा पाचशे रुपयांपेक्षा अधिक पैसे मोजले आहेत. जुनी दुर्मीळ नाणी जमविण्याच्या छंदापायी फसगत आणि कित्येकदा भुर्दंड सोसावा लागूनही एका मूकबधिर ध्येयवेड्या तरुणाने नाणे जमविण्याचा छंद जोपासला आहे.

नाशिक : केवळ पाच रुपयांच्या नाण्यासाठी ‘त्याने’ आजवर अनेकदा पाचशे रुपयांपेक्षा अधिक पैसे मोजले आहेत. जुनी दुर्मीळ नाणी जमविण्याच्या छंदापायी फसगत आणि कित्येकदा भुर्दंड सोसावा लागूनही एका मूकबधिर ध्येयवेड्या तरुणाने नाणे जमविण्याचा छंद जोपासला आहे.तुकाराम निना राऊत असे या मूकबधिर तरुणाचे नाव असून तो मोलमजुरी करतो. नाणे जमवून त्याचे प्रदर्शन करणे अथवा संग्राहक होणे असा कोणताही मोठा विचार त्याच्या डोक्यात डोकावला नाही. केवळ नाण्यांचे वेगळेपण पाहून त्याला अशी नाणी जमवावी, असे वाटले आणि त्याच्या छंदाला सुरुवात झाली. चलनात असलेली एक, दोन आणि पाच रुपयांची आजची नाणी आणि काही वर्षांपूर्वीच्या याच दराच्या नाण्यांवर असलेल्या वेगवेगळ्या मुद्रा याचे कुतूहल म्हणून तुकाराम राऊत याने नाण्यांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. त्याच्या या छंदाविषयी त्याचे बंधू विठ्ठल राऊत यांनी सांगितले की, तुकाराम हा कुणी दुर्मीळ वस्तूंचा संग्राहक अथवा अभ्यासक नाही. परंतु पूर्वी कोणत्याही दिन विशेषाचे कौतुक म्हणून नाण्यावर मोहर उमटविली जात असे. यातून त्या वर्षाचे महत्त्व अधोरेखित होत असे, ही बाब तुकारामाच्या लक्षात आली आणि त्याने या नाण्यांवर लक्ष केंद्रित केले. स्वत:कडे आलेल्या प्रत्येक नाण्याचे तो निरीक्षण करतो. मित्रांकडे असलेले नाणे स्वत:हून मागून घेतो आणि त्यातही तो नावीन्य शोधतो. कुणाकडे असे नाणे आहे असे कळल्यानंतर तो ते विकत घेतो. एका पाच रुपयाच्या नाण्यासाठी कधी त्याला पन्नास तर कधी पाचशे रुपयेदेखील मोजावे लागले आहेत. मोलमजुरी करणाºया आणि कर्णबधिर असलेल्या या कष्टकºयाच्या या छंदाने आता उभारी घेतली असून, नाण्यांचा संग्रह वाढविण्याचा त्याचा मानस आहे.