हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, पतीने केले दुसरे लग्न

By नामदेव भोर | Published: April 10, 2023 03:26 PM2023-04-10T15:26:42+5:302023-04-10T15:27:33+5:30

सदर घटना मुंबई नाका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीतून समोर आली आहे.

harassment of wife for dowry husband remarried | हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, पतीने केले दुसरे लग्न

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, पतीने केले दुसरे लग्न

googlenewsNext

नामदेव भोर, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : हुंड्यासाठी पत्नीचा छळ करण्यासोबतच पत्नीला मानसिक व शारीरिक त्रास देत पतीने दुसरे लग्न केल्याची घटना पीडित पत्नीने मुंबई नाका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीतून समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने , तिच्या पतीसह सासरच्या विरोधात रविवारी (दि.९) तक्रार दिली असून त्यानुसार, २५ नोव्हेंबर २०२० पासून ते दि.८ एप्रिल २०२३ या कालावधीत आसिफ आबीद खान (२९, रा. दत्त मंदिर रोड, शिवाजीनगर, सातपूर) , मेहरून्निसा(५७), आबीद खान (६०), आरिफ आबीद खान (३८), आरजू आरिफ खान (३०), नगमा समीम खान (३२, रा, सिल्वासा, दादरानगर हवेली), समीम नसीम खान (३५), मेहरबान रेहमान खान (४५, रा. सातपूर,) रिझवान रेहमान खान (३४), यांनी संगनमत करून पीडितेला माहेरून पैसे आणावे, तसेच घरगुती कारणातून तिला शिवीगाळ करीत शारीरिक व मानसिक छळ केला.

त्याचप्रमाणे पीडितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून घेतले व पीडितेच्या पतीने पहिले लग्न झालेले असताना दुसरे लग्न केले .त्यामुळे पीडितेने मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सासरच्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: harassment of wife for dowry husband remarried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.