५०१ दिव्यांनी उजळले मानोरीचे हनुमान मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 18:26 IST2020-08-06T18:26:08+5:302020-08-06T18:26:36+5:30

मानोरी : अयोध्येत राममंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर मानोरी बुद्रुक येथील हनुमान मंदिरात ५०१ पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

Hanuman Temple of Manori illuminated by 501 lights | ५०१ दिव्यांनी उजळले मानोरीचे हनुमान मंदिर

५०१ दिव्यांनी उजळले मानोरीचे हनुमान मंदिर

यावेळी श्रीरामरक्षा स्तोत्रचे सामूहिक पठण तसेच धार्मिक गीतांचे कार्यक्र मही घेण्यात आला. तसेच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. बाबासाहेब तिपायले यांनी अयोध्येत आजपर्यंत घडलेल्या इतिहासाची माहिती उपस्थित भाविकांना दिली. कार्यक्र मास प्रवीण जोशी, विकास बोराडे, अनुराग जोशी, सागर भावर, राहुल भवर, पंकज खैरनार, तुषार शेळके, आनंदा भवर, गणेश तिपायले, अक्षय शेळके, महेश जाधव, सुदाम बोराडे, सुमनबाई तिपायले, मीरा शेळके, अंजनाबाई वाघ, अंजली तिपायले, संगीता बोराडे, मंजुषा जोशी, लहानुबाई घोलप आदी उपस्थित होते.

Web Title: Hanuman Temple of Manori illuminated by 501 lights