शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

देणाऱ्यांचे हात मदतीसाठी सरसावले

By admin | Updated: September 29, 2016 01:25 IST

माणुसकीचा गहिवर : विश्वास बॅँकेकडून मुलीला नोकरी, सोशल नेटवर्किंगने घेतली कोर्ट खर्चाची हमी

संजय वाघ  नाशिक समाजात वाईट प्रवृत्तीची माणसे पावलोपावली भेटतात म्हणून माणुसकी पूर्णपणे रसातळाला गेली असे नव्हे, समाजाप्रती बांधिलकी जपणारी माणसेही आपल्या अवतीभोवतीच नांदत असतात, त्यांचे प्रत्त्यंतर आले की माणुसकीचा गहिवर आणि चांगुलपणा आजही शाबूत असल्याची भावना दृढ झाल्यावाचून राहत नाही. याचा प्रत्यय बुधवारी अनुभवयास आला.. निमित्त होते लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या परिवाराच्या कैफियतीचे! आयुष्यभर वंचितांच्या दु:खाला आणि श्रमिकांच्या वेदनेला वाचा फोडणाऱ्या वामनदादांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराची वाताहत झाल्याचे ‘तुफानातील दिवा विझल्यानंतर कुटुंबही ‘अंधारा’त!’ हे वृत्त ‘लोकमत’मध्ये दि. २८ रोजी प्रसिद्ध झाले. मुलगा रवींद्र कर्डक व नातू वैभव यांनी उदरनिर्वाहासाठी सिक्युरिटीची नोकरी पत्करली परंतू त्यांच्या या नोकरीमुळे वामनदादांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहचते असा आक्षेप घेतला गेल्याने पिता-पुत्रावर बेरोजगारीची वेळ आली होती. शासनातर्फे दादांना मंजूर झालेल्या सदनिकेचा ताबा मिळण्याचा तसेच नात कोमलच्या शिक्षणाचा आणि नोकरीचा प्रश्नही कर्डक परिवाराला सतावत होता. कर्डक परिवाराची आपबिती वाचून अनेकांनी हळहळ व्यक्त केली तर देणाऱ्यांचे हात मदतीसाठी पुढे सरसावले. त्यात पहिले नाव होते विश्वास बॅँकेचे चेअरमन विश्वास ठाकूर यांचे. त्यांनी कर्डक परिवाराला बॅँकेत बोलावून तुमच्या मुलीला बॅँकेत नोकरी देतो तसेच तुम्ही ज्या भागात राहत असाल तेथील शाखेत तिला कामावर घेण्याचे जाहीर केले.नाशिकमधीलच सोशल नेटवर्किंग फोरमनेदेखील मदतीचा हात पुढे केला. कर्डक परिवाराला आर्थिक मदतीसह वामनदादांना मंजूर झालेली सदनिका त्यांच्या वारसाला मिळवून देण्यासाठी न्यायालयीन कामकाजाकरिता जो खर्च लागेल तो सर्व उचलण्याची हमी या फोरमने घेतल्याचे प्रमोद गायकवाड, विलास यशवंते, निलेश कळसकर, अ‍ॅड. गुलाब आहेर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.