शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

मार्गदर्शक माहिती : साधुग्राममध्येही लावणार नकाशे

By admin | Updated: March 24, 2015 00:01 IST

पालिका बनविणार कुंभमेळ्याचे अ‍ॅप

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात शहरात दाखल होणाऱ्या भाविकांना आपल्या भ्रमणध्वनीवर रस्ते, महत्त्वाची ठिकाणे, हॉस्पिटल्स, लॉजेस, धर्मशाळा यांसह उपयुक्त अशी माहिती सहजगत्या उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिका अ‍ॅप विकसित करणार असल्याचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले. दरम्यान, साधुग्रामसह तपोवनातील दहाही सेक्टर्समध्ये माहितीपर नकाशे उभारण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.आयुक्त डॉ. गेडाम यांनी सोमवारी तपोवनातील साधुग्रामसह सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली. त्याबाबत आयुक्तांनी सांगितले, कुंभमेळ्यात पर्वणीकाळात कोट्यवधी भाविक शहरात दाखल होणार आहेत. या भाविकांना गोदाघाटाकडे जाणारे रस्ते, त्यांचे अंतर, महापालिकेची रुग्णालये तसेच आरोग्य सुविधा केंद्र यापासून ते पर्वणीकाळाचे नियोजन यासंबंधीची माहिती सहजगत्या उपलब्ध व्हावी, याकरिता महापालिका स्वत:च कुंभमेळाविषयक अ‍ॅप तयार करत असून, भाविकांना त्यासाठी कुठेही चौकशी करावी लागू नये, अशी व्यवस्था साकारण्याची तयारी सुरू आहे. सदर अ‍ॅप पर्वणीकाळातील तीन महिन्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. याशिवाय महापालिकेच्याही संकेतस्थळाची पुनर्रचना करण्यात येत आहे. दरम्यान, तपोवनातील साधुग्राममध्ये प्रत्येक सेक्टरच्या प्रवेशद्वारावर १० बाय १५ चा सर्व माहिती देणारा नकाशा लावण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये किती रस्ते आहेत, प्लॉट नंबर्स, संबंधित अधिकारी व त्यांचे भ्रमणध्वनी नंबर्स, कॉल सेंटर व हेल्पलाइनचे नंबर यांची माहिती समाविष्ट केली जाणार आहे. प्रत्येक सेक्टरसाठी दोन कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती केली जाणार असून, त्यांच्यामार्फत त्या-त्या सेक्टरचे नियंत्रण केले जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)