शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

देवळ्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

By admin | Updated: October 21, 2016 01:23 IST

राष्ट्रवादी : वाखारी, उमराणा, लोहोणेर परिसराचा आढावा

 देवळा : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी देवळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक देवळा येथे घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. देवळा मर्चंट बँकेच्या सभागृहात सपन झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष पंडित निकम होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती उषा बच्छाव, जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार, प्रांतिक सदस्य योगेश अहेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील अहेर, चिंतामण अहेर, राजेंद्र देवरे, नूतन अहेर, डॉ.संजय निकम, अनंत आहिरराव आदि उपस्थित होते. यावेळी इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची इच्छा प्रकट करीत आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या वाखारी गटातून विद्यमान पंचायत समिती सदस्य लीना योगेश अहेर, नूतन सुनील अहेर, डॉ. कविता संजय निकम तसेच लोहोणेर गटातून सरपंच जयवंता दीपक बच्छाव, खामखेडा येथील मंगला दिलीप शेवाळे, निंबोळा येथील मंगल दिलीप पाटील यांनी पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. वाखारी व लोहोणेर हे गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत. उमराणा गट हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून दहीवड येथील मोहिनी राजू आहिरे, उमराणे येथील रवि शिरसाठ, इॅश्वर मोरे आदि या गटातून निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक आहेत. पंचायत समितीच्या उमराणे गणात सतीश ठाकरे, चंद्रकांत वाघ (सर्वसाधारण). लोहोणेर गणात मनीषा निकम (सर्वसाधारण स्त्री) व महालपाटणे गणात दिलीप पाटील (ना.मा. प्रवर्ग) निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. यावेळी पंडित निकम, योगेश अहेर, सुनील अहेर, उमराणा सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, प्रकाश गुंजाळ आदिंनी आपल्या विचारातून पक्षाची भूमिका मांडली. देवळा तालुक्यात उमेदवारी देताना पक्षासाठी योगदान देणाऱ्या एकनिष्ठ असलेल्या उमेदवारालाच उमेदवारी देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. रणधीर गुरुजी यांनी आभार मानले. (वार्ताहर)