सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील अप्सरा लॉन्स येथे शेतकऱ्यांसाठी डाळिंब पिकावर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.शेतमाल अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने आयोजित शिबिरात डाळिंबरत्न डॉ. बाबासाहेब गोरे यांनी डाळिंब मृगबहार व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी डाळिंब झाडाचे मूळ, खोड, पान, जमीन आदींचे कार्य व महत्त्व याबद्दल माहिती दिली. यावेळी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी चर्चासत्रात भाग घेऊन डाळिंब पिकाविषयी माहिती जाणून घेतली.
दोडीत डाळिंबावर मार्गदर्शन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 18:25 IST