शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी मूकबधिरांच्या समूह नृत्य स्पर्धा

By admin | Updated: September 16, 2014 00:24 IST

मालेगावी मूकबधिरांच्या समूह नृत्य स्पर्धा

मालेगाव कॅम्प : मालेगावी जैन संघटनेतर्फे अंध, अपंग, मूकबधिर विद्यार्थ्यांच्या अपंग समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. माळी मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीनिवास काकाणी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ओंकार लिंगायत उपस्थित होते.जैन संघटना संचलित आनंद मंगल संस्था, जैन संगिनी फोरम यांच्या समन्वयाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत मालेगाव, सटाणा, येवला, नाशिक येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. येथील संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अप्रतिम कलेने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. शारीरिक दृष्ट्या आपण अपंग असलो तरी जिद्दीने काही करून दाखवू शकतो हे सिद्ध करून दाखवले. स्पर्धेत वृक्षतोड, पर्यावरण, सर्कस, जागर, गोंधळ, भुताणे झपाटले आदिंवर आपल्या कला दाखवत समूहनृत्य केले. प्रास्ताविक रेखा नहार यांनी केले.कार्यक्रमात आठ ते दहा समूह गटांनी सहभाग घेतला. यात सर्वप्रथम कार्यक्रमाचे पारितोषिक प्रबोधिनी स्कूल, नाशिक, दुसरे नाशिक प्रबोधिनी कार्यकारी विद्यालय, तिसरे महानव अंधशाळा यांना मिळाले. यात अंध, मूकबधिर विद्यार्थी केवळ आपल्या शिक्षकांच्या संकेत व संगीताच्या नादावर ताल धरत होते. त्यामुळे उपस्थित सर्व अचंबित झाले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र बोरा यांनी केले. संघटनेच्या अध्यक्ष कविता कासलीवाल, उपाध्यक्ष अनुपमा कासलीवाल, संगिनी फोरम्या सौ. पंकज वडेरा, ममता कासलीवालसह जैन संघटनेचे ट्रस्टी सचिन शहा, सदस्य वर्धमान नानावटी, नेमिचंद मोदी, अनिल लोढासह विविध संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)