ठाणगावी संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 17:54 IST2021-01-11T17:54:00+5:302021-01-11T17:54:21+5:30
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे संताजी जगनाडे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आल. दरम्यान, याप्रसंगी कोरोना योद्ध्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

ठाणगावी संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन
संताजी मंगल कार्यालयात नामदेव शिंदे यांच्या हस्ते जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास ए.टी. शिंदे, डॉ.पी.एस. केदार, प्राचार्य व्ही.एस. कवडे, नवनाथ दौंड, विष्णुपंत पाटोळे, अरुण केदार, नीलेश केदार, सचिन रायजादे आदींनी जगनाडे महाराज यांना अभिवादन केले. यावेळी उपसरपंच शेखर कर्डीले यांनी संताजी महाराज जगनाडे यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी विलास केदार, मिलिंद वालझाडे, अरुण कर्डिले, दत्तात्रेय कर्डिले, बाळासाहेब कर्डिले, कैलास व्यवहारे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.