‘मार्सेलिस उडी’च्या स्मरणार्थ सावरकरांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:33 IST2018-07-10T00:32:33+5:302018-07-10T00:33:15+5:30
सावरकर समूहाच्या वतीने स्वा. सावरकरांच्या मार्सेलिस उडीच्या स्मरणार्थ त्यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम सावरकर जन्मस्थान स्मारकात करण्यात आला.

‘मार्सेलिस उडी’च्या स्मरणार्थ सावरकरांना अभिवादन
भगूर : सावरकर समूहाच्या वतीने स्वा. सावरकरांच्या मार्सेलिस उडीच्या स्मरणार्थ त्यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम सावरकर जन्मस्थान स्मारकात करण्यात आला. भाजपा नेते रामदास आंबेकर यांनी सांगितले की, अवघ्या २७व्या वर्षी सावरकरांनी मारलेल्या या उडीने ब्रिटिश शासन हादरले. सावरकरांच्या अटकेचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायासनासमोर गेला. असा पहिला भारतीय देशभक्त म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. प्रारंभी योगेश बुरके व रामदास आंबेकर यांच्या हस्ते सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पवन आंबेकर, मंगेश मरकड, प्रमोद आंबेकर, सुदाम वालझाडे, प्रमोद घुमरे, संतोष करंजकर, संदेश बुरके, केतन कुवर, आशिष वाघ, विलास कुलकर्णी, प्रसाद आडके, मधुकर कापसे, सुनील जोरे, दिगंबर करंजकर, सौरभ कुलकर्णी आदी उपस्थित होते.
सुमारे १०८ वर्षांपूर्वी म्हणजे ८ जुलै १९१० या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांच्या बोटीवर अटकेत असताना बोटीवरून फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात मारलेली उडी, ही सागर आणि आकाश यांना साक्ष ठेवून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची उभारलेली गुढी होती, असे सावरकर समूहप्रमुख मनोज कुवर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सागितले,