संत सेना महाराज यांना नाशिकरोडला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 01:09 IST2020-08-17T21:48:41+5:302020-08-18T01:09:24+5:30

नाशिकरोड : जेलरोडच्या इंगळेनगर मधील राधा कृष्ण मंदिरांमध्ये संत सेना फाऊंडेशनच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.

Greetings to Sant Sena Maharaj at Nashik Road | संत सेना महाराज यांना नाशिकरोडला अभिवादन

संत सेना महाराज यांना नाशिकरोडला अभिवादन

ठळक मुद्दे नाभिक बांधवांनी रक्तदान करून शासकीय विभागीय संदर्भ रु ग्णालयास मदत केली.

नाशिकरोड : जेलरोडच्या इंगळेनगर मधील राधा कृष्ण मंदिरांमध्ये संत सेना फाऊंडेशनच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.
कोरोनाच्या पाशर््वभूमीवर यंदा चिंतामणी बहुउद्देशीय संस्था तसेच संत सेना फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करून साधेपणाने पुण्यतिथीचा कार्यक्रम घेतला. यावेळी नाभिक बांधवांनी रक्तदान करून शासकीय विभागीय संदर्भ रु ग्णालयास मदत केली. यावेळी संत सेना फाऊंडेशनचे संजय गायकवाड म्हणाले , नाभिक बांधवांच्या कल्याणासाठी सामूहिक निधी संकलन व्हावा. यासाठी निधी संकलन पेटीचे वाटप करण्यात येईल असे स्पष्ट केले. यावेळी संत सेना फाऊंडेशनचे उपाध्यक्ष रमेश आहेर,राजू तुपे, कैलास शिंदे, अशोक कदम, नाभिक महामंडळाचे महानगरप्रमुख अरु ण सैदाणे, उत्सव समतिीचे अध्यक्ष सुनील कदम, कार्याध्यक्ष बाळासाहेब बिडवे, उपाध्यक्ष आबा निकम, खिजनदार प्रितेश जाधव, सचिव संजय वाघ, मनोहर कोल्हाळकर, केदारनाथ गायकवाड,शांताराम जाधव,ऋ षिकेश कदम, निलेश निकम, संतोष गायकवाड, चंदन वाघ, राजू मोरे, राजू वडसाळ आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Sant Sena Maharaj at Nashik Road