तथागतांसह रमाबाई आंबेडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 07:22 PM2021-05-29T19:22:45+5:302021-05-30T00:00:09+5:30

मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखेतर्फे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती व रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Greetings to Ramabai Ambedkar with Tathagata | तथागतांसह रमाबाई आंबेडकर यांना अभिवादन

मनमाड रेल्वे कारखान्यात अभिवादन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित संघटनेचे पदाधिकारी.

Next
ठळक मुद्देभगवान गौतम बुद्ध व रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण

मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखेतर्फे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती व रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

संघटनेचे झोनल सचिव सतिश केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कारखाना शाखाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, बहुजन युवक संघाचे कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, किशोर वानखेडे, राजेंद्र मोरे आदी उपस्थित होते.

किशोर वानखेडे, राजेंद्र मोरे, अंबादास आहेर, चंद्रकांत कासार, संजय काळे, संतोष माळी, राजेंद्र नांगरे यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रास्ताविक सचिव सागर गरूड यांनी तर आभारप्रदर्शन पंढरीनाथ पठारे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शरद झोंबाड यांनी केले.
 

Web Title: Greetings to Ramabai Ambedkar with Tathagata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.