करंजखेड येथे हुतात्मा नाग्या कातकरी बलिदान दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 15:19 IST2020-09-26T15:17:39+5:302020-09-26T15:19:57+5:30
पेठ : इंग्रज राजवटीच्या विरोधात आदिवासी जनतेवर होणार्या अन्याय व जंगल सत्याग्रहात हुतात्मा झालेले नाग्या महादू कातकरी यांच्या बलिदान दिनानिमति जनसेवा मंडळाच्या वतीने पेठ तालुक्यातील करंजखेड येथे प्रमिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

करंजखेड येथे हुतात्मा नाग्या कातकरी बलिदान दिनानिमित्त अभिवादन करतांना ग्रामस्थ व जनसेवा मंडळाचे सदस्य.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : इंग्रज राजवटीच्या विरोधात आदिवासी जनतेवर होणार्या अन्याय व जंगल सत्याग्रहात हुतात्मा झालेले नाग्या महादू कातकरी यांच्या बलिदान दिनानिमति जनसेवा मंडळाच्या वतीने पेठ तालुक्यातील करंजखेड येथे प्रमिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
रायगडाच्या उरण जवळच्या चिरनेर सत्याग्रहात नाग्या कातकरी यांनी नेतृत्व केले होते. इंग्रजांशी लढा देतांना त्यांनी दिलेले बलिदान तमाम आदिवासी जनतेला प्रेरणादायी ठरत असल्याचे कमलेश वाघमारे यांनी सांगितले.
याप्रसंगी जनजाती कल्याण आश्रमचे स्वप्नील वाघमारे, हनुमंत वाघमारे, मनोहर जाधव, करंजखेड ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक, सदस्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.