ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे असोसिएशनच्या वतीने अभिवादन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 00:04 IST2021-05-29T16:53:08+5:302021-05-30T00:04:24+5:30
मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा व माता रमाबाई आंबेडकर स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मनमाड रेल्वे कारखान्यात अभिवादन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित संघटनेचे पदाधिकारी.
मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा व माता रमाबाई आंबेडकर स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संघटनेचे झोनल सचिव सतिश केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कारखाना शाखाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, बहुजन युवक संघ चे कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, किशोर वानखेडे, राजेंद्र मोरे आदी उपस्थित होते.
किशोर वानखेडे, राजेंद्र मोरे, अंबादास आहेर, चंद्रकांत कासार, संजय काळे, संतोष माळी, राजेंद्र नांगरे यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव सागर गरूड यांनी केले तर आभारप्रदर्शन पंढरीनाथ पठारे यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शरद झोंबाड यांनी केले.