महामानवाला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 02:06 IST2021-04-14T02:05:01+5:302021-04-14T02:06:08+5:30

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त शहरातील शिवाजीरोडवरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास रात्री अभिवादन करण्यात आले.

Greetings to Mahamanwala | महामानवाला अभिवादन

महामानवाला अभिवादन

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त शहरातील शिवाजीरोडवरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास रात्री अभिवादन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अजित तेजाळे, जयश्री तेजाळे, विकास व सोनम तेजाळे, विजेंद्र-विभा गाडे, शुभम - दीक्षा इंगळे, चंद्रकांत व पूनम पाटोळे. यावेळी घेण्यात आलेल्या बुद्धवंदनेस स्थायी समितीचे माजी सभापती संजय साबळे, मदन शिंदे, शशिकांत पगारे, वामनराव गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, किशोर तेजाळे, दीपचंद दोंदे, पप्पू तेजाळे, किशोर गांगुर्डे, योगेश तेजाळे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यात आला. एका वेळेस मोजक्याच व्यक्तींना परवानगी देण्यात आली.

Web Title: Greetings to Mahamanwala