जानोरी येथे बिरसा मुंडा यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:17 IST2020-11-19T20:50:47+5:302020-11-20T01:17:25+5:30

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे आणि बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन संघटनेतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली.

Greetings to Birsa Munda at Janori | जानोरी येथे बिरसा मुंडा यांना अभिवादन

जानोरी येथे बिरसा मुंडा यांना अभिवादन

ठळक मुद्देछोट्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे आणि बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन संघटनेतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशनचे अध्यक्ष डॉ .श्रीराम लहामटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर छोट्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सोमनाथ जोशी, नाशिक जिल्हाध्यक्ष नवनाथ हुमण, नाशिक युवा जिल्हाध्यक्ष तुकाराम वारघडे, जिल्हा सचिव योगेश रिंझड, भाऊसाहेब नेहरे, प्रभाकर फसाळे, लक्ष्मीनगरच्या सरपंच मंगल खोकले, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा भडांगे, निफाड तालुका अध्यक्ष सुनील पागे, रमेश बेंडकोळी, विठ्ठल काळे, भोरू काठे, चंद्रकांत बेंडकोळी, गणपत बस्ते, मोहन उंबरसडे, राहुल तुंबडे, मछिंद्र कुंदे, पोपट भडांगे, संगीता सरनाईक, गणेश तिडके, अशोक केंग, सुरेश घुमरे आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Birsa Munda at Janori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.